Pune Crime : स्कूल बसमध्ये ड्रायव्हरकडून दोन चिमुकलींवर निर्घृण अत्याचार, पुणं हादरलं
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस ड्रायव्हर चालकाकडून चिमुकल्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली असून मोठी खळबळ माजली आहे. त्या नराधमाविरोधात गुन्हा वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
बदलापूरमधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. ही घटना ताजी असतानाच आता विद्येचे माहेर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात स्कूल बसमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर ड्रायव्हरकडून अत्याचार करण्यात आला. वानवडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी 45 वर्षांच्या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या घटनेची कुठेही वाच्यता करून नये म्हणून त्या नराधमाने त्या मुलींना धमकीही दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस स्थानकात अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा नराधम आरोपी सहा वर्षांच्या दोन चिमुरड्यावर गेल्या चार दिवसांपासून बसध्ये अत्याचार करत होता, अशी माहिती समोर आली आहे.
सदर आरोपी एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडतो. दोन्ही पीडित मुली या त्याच्या बसमधील पुढच्या सीटवर बसायच्या. गेल्या चार दिवसांपासून तो ड्रायव्हर दोन्ही मुलींशी अश्लील कृत्य करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. घडलेल्या घटनेबद्दल कुणालाही सांगायचं नाही, अशी धमकीही त्या नराधमाने मुलींना दिली होती.
मात्र पीडित मुलींपैकी एक मुलगी घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेट पार्टजवळ वेदना होऊ लागल्या. तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने ड्रायव्हर काकांनी केलेल्या दुष्कर्माबद्दल आईला सांगितलं आणि हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.