धक्कादायक ! उल्हासनगरात 20 जणांची टोळी कोणाच्या शोधात?; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय कैद?

मुंबई शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, त्यामुळे नागरीक जीव मुठीत धरून जगताना दिसतात. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला तरी काही गुन्हेगार त्यांच्या हातावरही तुरी देऊन निसटतात आणि गुन्हे करून फरार होतात. उल्हासनगरमध्येही नागरिकांची चिंता वाढवणारी एक घटना उघडकीस आली आहे.

धक्कादायक ! उल्हासनगरात 20 जणांची टोळी कोणाच्या शोधात?; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय कैद?
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 11:54 AM

मुंबई शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, त्यामुळे नागरीक जीव मुठीत धरून जगताना दिसतात. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला तरी काही गुन्हेगार त्यांच्या हातावरही तुरी देऊन निसटतात आणि गुन्हे करून फरार होतात. उल्हासनगरमध्येही नागरिकांची चिंता वाढवणारी एक घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठवड्यात उल्हानगरमध्ये काही तरूणांची टोळी फिरत असल्याचे आणि कोणाचा तरी शोध घेत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या संतोषनगरमध्ये काही दिवसांपुर्वी रात्रीच्या सुमारास २० जणांची टोळी कोणाच्या तरी शोधात फिरत होती, ही टोळी संतोषनगर मधील एका तरुणाची हत्या करण्यासाठी आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय कैद ?

मिळालेल्या माहितीनुसार, 9 तारखेला रात्री साडेनऊच्या सुमारास उल्हासनगर कँप नंबर ४ संतोषनगर येथे काही तरुणांचं टोळक सीसीटीव्हीमध्ये दिसलं होतं. काहींचा चेहरा रुमालाने बांधून झाकून घेतलेला तर काहींच्या डोक्यावर हुडी अशा अवतारात २० तरूण एकामागोमाग एक एका ठिकाणी जमा झाले. काहींच्या हाताच तलवार, चाकू, दांडकी तर काहींच्या हातात चॉपर होते. बराच वेळ कोणाच्या तरी शोधात असल्यासारखे फिरत होते आणि त्यानंतर एकामागोमाग चालत निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. एका तरुणाची हत्या करण्यासाठी ते फिरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

नागरिकांना कायदा हातात घ्यायला लावू नका

आता या प्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे हे आक्रमक झाले असून त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांचा चांगलाच समाचार घेतला. या शहरात असे प्रकार वारंवार होतात. पोलिस यंत्रणा शहरात आहे का, त्यांचा काही वचक आहे की नाही, असा प्रश्न पडलाय अशी टीका बोंडारे यांनी केली आहे.

दरम्यान त्यांनी शहरात फिरणाऱ्या या अज्ञात तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या तरूणांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच नागरिकांना कायदा हातात घ्यायला लावू नका असे आवाहन देखील बोडारे यांनी पोलीस प्रशासनाला केले आहे.

Non Stop LIVE Update
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?.
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.