जेवण आणण्यासाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही, ठाण्यात हिट अँड रन, 21 वर्षांच्या तरूणाचा नाहक बळी

ठाण्यात एक मोठा भीषण अपघात झाला असून वेगाने आलेल्या कारचालकाने बाईकस्वाराला धडक दिली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कारचालक तेथून पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

जेवण आणण्यासाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही, ठाण्यात हिट अँड रन, 21 वर्षांच्या तरूणाचा नाहक बळी
हिट अँड रन केसImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 8:46 AM

राज्यात हिट अँड रनच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांत घडल्या असून अनेक निष्पाप लोकांनी जीव गमावले आहेत. पुण्यातील कल्याणीनगरमधील भीषण अपघात असो किंवा वरळीत झालेला अपघात असो हिट अँड रनच्या प्रकरणांनी अख्खं राज्य हादरलं. काही दिवसांपूर्वीच पुण्यात पुन्हा असाच एक अपघात घडला होता, जेव्हा एक आलिशान कारने डिलीव्हरी बॉयला उडवलं आणि त्याची मदत न करता तो तेथून फरार झाला, ज्यामध्ये त्या तरूणाचा मृत्यू झाला. आता असाच एक प्रकार ठाण्यातही घडला आहे. तेथेही हिट अँड रनची अशीच एक घटना घडली असून त्यामध्ये 21 वर्षांच्या तरूणाचा नाहक बळी गेला. भराधव वेगाने कार चालवणाऱ्या इसमाने बाईकस्वाराला उडवलं, तो जखमी होऊन खाली कोसळला, मात्र त्याची मदत न करता तो कारचालक तेथून फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू झाला आहे .

मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील नितीन जंक्शन येथे हा अपघात झाला असून त्यामध्ये 21 वर्षांच्या दर्शन शशिधर हेगडे या तरूणाचा मृत्यू झाला . तो ठाण्यातीलच वागळे इस्टेट परिसरातील संत ज्ञानेश्वर साईकृपा सदन चाळीत रहात होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस अधिक तपास करत असून आरोपी कारचालकाचा कसून शोध घेत आहेत.

रात्री उशीरा अपघात

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. भरधाव वेगाने आलेल्या कारने दर्शनच्या बाईकला जोरदार धडक दिली आणि चिरडलं. खाली कोसळलेला दर्शन गंभीर जखमी झाला होता. मात्र त्याच्या मदतीसाठी न थांबता कारचलाक पळू गेला.

जेवण आणण्यासाठी उशीरा घराबाहेर पडला पण परत आलाच नाही

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या रात्री दर्शन हाँ त्याच्या भावाची बाईक चालवत होता. तो जेवण आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. नितीन जंक्शन येथून जाताना नाशिक हायवे वर मुंबईच्या दिशेहून एक कार भरधाव वेगाने आली. MH 02 BK 1200 हा त्या कारचा रजिस्ट्रेशन नंबर होता. त्या कारने दर्शनच्या बाईकला धडक दिली आणि तो खाली कोसळला. अपघातात दर्शन गंभीर जखमी झाला. पण कारटालक त्याच्या मतदीसाठी काही थांबला नाही, तो तेथून लागलीच फरार झाला. दर्शनला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असून अपघातावेळी तो नशेत होता का याचाही तपास केला जात आहे.

राऊत महाबंडलेश्वर, प्रयागच्या संगमावर डुबकी.., शिवसेनेचा नेत्याचा टोला
राऊत महाबंडलेश्वर, प्रयागच्या संगमावर डुबकी.., शिवसेनेचा नेत्याचा टोला.
जयपूर साहित्य महोत्सवात दोन दिग्गजांचा परिसंवाद; संपूर्ण VIDEO ऐका
जयपूर साहित्य महोत्सवात दोन दिग्गजांचा परिसंवाद; संपूर्ण VIDEO ऐका.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 'या' 10 मोठ्या घोषणा, काय आहे खास?
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 'या' 10 मोठ्या घोषणा, काय आहे खास?.
लाडक्या बहिणींसाठी काय खास?;दादांनी सांगितली राज्याच्या बजेटची तारीख
लाडक्या बहिणींसाठी काय खास?;दादांनी सांगितली राज्याच्या बजेटची तारीख.
मोदी सरकारची मोठी घोषणा, गंभीर आजारावरील 36 औषधं टॅक्स फ्री
मोदी सरकारची मोठी घोषणा, गंभीर आजारावरील 36 औषधं टॅक्स फ्री.
मध्यमवर्गीयांवर फोकस, नोकरदारांना मोठा दिलासा; अशी असणार नवी कररचना
मध्यमवर्गीयांवर फोकस, नोकरदारांना मोठा दिलासा; अशी असणार नवी कररचना.
यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग? बघा एकाच व्हिडीओमध्ये....
यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग? बघा एकाच व्हिडीओमध्ये.....
Union Budget 2025 : अर्थसंकल्पातील 'या' 10 महत्त्वाच्या घोषणा
Union Budget 2025 : अर्थसंकल्पातील 'या' 10 महत्त्वाच्या घोषणा.
'...म्हणून मुंडेंना आधार दिला', महंत नामदेव शास्त्री स्पष्टच बोलले
'...म्हणून मुंडेंना आधार दिला', महंत नामदेव शास्त्री स्पष्टच बोलले.
गडाआडून मुंडेंचा दबाव? तर महंत नामदेव शास्त्रींचा 'राजकीय' इशारा काय?
गडाआडून मुंडेंचा दबाव? तर महंत नामदेव शास्त्रींचा 'राजकीय' इशारा काय?.