कुणी नदीत उडी मारली, कुणी आत्महत्येचा इशारा दिला, तर कुणी बदली विरोधात मॅटमध्ये जाणार…पोलीस दलात खळबळ
नाशिक शहर पोलीस दलात 22 कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताकामी पोलीस आयुक्तांनी मुख्यालयात संलग्न करून घेतल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक : पोलीस कर्मचाऱ्यांच्या (Police Employee) भूमिकेमुळे नाशिक शहर पोलीस (Nashik City Police) दलातील वातावरण ढवळून निघाले आहे. तब्बल 22 कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या तक्रारीच्या आधारावर बदली करण्यात आल्याची बाब समोर आली आहे, मुख्यालयात बदली करण्यात आल्याने कर्मचारी बेकायदेशीर बदलीच्या (Transfer) विरोधात मॅट न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. त्यातच शहर हद्दीत एका पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हिडिओ शेयर करत आत्महत्या केल्याची बाब मागील आठवड्यात घडलेली असतांना आणखी एकाने वरिष्ठांच्या जाचाल कंटाळून नदीत उडी मारल्याची बाब समोर आली होती. त्यावरून नाशिकच्या पोलीस दलात नेमकं चाललंय काय ? अशी चर्चा नाशिकच्या पोलीस वर्तुळात सुरू झाली आहे.
नाशिक शहर पोलीस दलात 22 कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताकामी पोलीस आयुक्तांनी मुख्यालयात संलग्न करून घेतल्याने खळबळ उडाली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरुन आणि लोकप्रतिनिधीच्या तक्रारीवरून या बदल्या केल्याचे बोलले जात आहे.
त्यातच हे 22 कर्मचारी आता मॅटमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पोलीस प्रमुखांवर कर्मचारी नाराज असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
गणेश विसर्जनच्या दिवशी एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचे कारणही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्रास असल्याची चर्चा होती.
त्यानंतर विभाग एक मधील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने व्हिडिओ क्लिप आणि मेसेज शेयर करून आत्महत्या करत असल्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर विभाग दोन मधील एका कर्मचाऱ्याने देखील थेट नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचेही कारण वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून होणार त्रास ही बाब होती.
एकूणच ही बाब पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यापर्यन्त पोहचल्यानंतर त्यांनी आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
एकूणच नाशिक पोलीस दलात नेमकं चाललंय काय ? अशी चर्चा सुरू झाली असून पोलीस प्रमुखांच्या विरोधात नाराजीचे वातावरण पसरले आहे.
बंदोबस्ताकामी संलग्न करण्यात आलेले 22 कर्मचारी हे कायदेशीर सल्ला घेत असून मॅट न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.