Mumbai Crime : एअर होस्टेसच्या हत्येने शहर हादरलं, 23 वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

मृत तरूणी घरात एकटी असताना हा प्रकार घडला. तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्स गावी गेल्याने घरी तिच्याशिवाय कोणीच नव्हतं. तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai Crime : एअर होस्टेसच्या हत्येने शहर हादरलं, 23 वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ !
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 10:09 AM

मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : मुंबईतील गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील पवई भागात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. एका 23 वर्षीय तरूणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. मृत तरूणी ही हवाई सुंदरी अर्थात एअर होस्टेस (air hostess murder) म्हणून काम करत होती अशी माहिती समोर आली आहे. राहत्या घरात तिचा मृतदेह (crime news) सापडला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रुपल ओगरे असे मृत तरूणीचे नाव असून ती 23 वर्षांची होती. ती मूळची छत्तीसगडच्या, रायपूर येथील रहिवासी होती. मात्र सध्या ती मुंबईतील मरोळ येथील एक इमारतीतील फ्लॅटमध्ये रहात होती. तिच्यासोबत तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्सही होते. तिची गळा चिरून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

घटनेच्य दिवशी रूपल घरात एकटीच होती. तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्स हे गावी गेल्याने तिच्यासोबत घरी कोणीच नव्हते. तिचे कुटुंबीय तिला बऱ्याच काळापासून कॉल करत होते, मात्र ती फोन उचलत नव्हती. अखेर त्यांनी तिच्या मैत्रिणीला फोन करून ती ठीक आहे ना हे बघण्यास सांगितले. तिची मैत्रीण तिच्या घरी पोहोचली. बराच वेळ दार वाजवल्यानंतरही कोणीच उघडले नाही. अखेर दरवाजा तोडून ती आत घुसली असता रुपल मृतावस्थेत आढळली. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पवई पोलीस आणि क्राईम ब्रांचचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.