CCTV Video : उल्हासनगरमध्ये एकाच रात्री 25 गाड्यांची तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद
उल्हासनगर कॅम्प क्र. 3 येथे काल मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास अज्ञात 15 जण घुसले. या इसमांनी परिसरात उभ्या असलेल्या गाड्या तोडफोड करण्यास सुरुवात केली. एकूण 25 गाड्यांची तोडफोड या इसमांनी नुकसान केले.
उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 येथील सुभाष नगर कालीमाता मंदिरामागे काल रात्री अज्ञात 15 इसमांनी 25 गाड्यांची तोडफोड (Vandalized) केली. त्या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास 20 ते 25 अज्ञात इसम याठिकाणी आले. त्यांनी हातात असलेल्या लोखंडी रॉड पाईप लाकूड उभ्या असलेल्या सर्व गाड्यांची तोडफोड केली. त्या तोडफोडीत 20 ते 25 गाड्यांचे नुकसान (Loss) झाले आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे हल्लेखोर सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या समाजकंटक हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
उल्हासनगरमध्ये एकाच रात्री 25 गाड्यांची तोडफोड#Ulhasnagar #Vehicles #Vandalized #cctv pic.twitter.com/t8bKCtD2ql
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi (@TV9Marathi) July 17, 2022
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु
उल्हासनगर कॅम्प क्र. 3 येथे काल मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास अज्ञात 15 जण घुसले. या इसमांनी परिसरात उभ्या असलेल्या गाड्या तोडफोड करण्यास सुरुवात केली. एकूण 25 गाड्यांची तोडफोड या इसमांनी नुकसान केले. मात्र या हल्लेखोरांनी ही तोडफोड कोणत्या कारणावरुन केली हे अद्याप कळू शकले नाही. तोडफोड करणारे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवत त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींच्या अटकेनंतरच ही तोडफोड का केली हे स्पष्ट होईल.
कल्याण डोंबिवली रिक्षा चोरणारी टोळी सक्रिय
कल्याण डोंबिवलीत रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे रिक्षा चालक धास्तावले असून चोरीवर आळा घालण्यासाठी रिक्षा संघटनांनी पोलीस उपायुक्तांना निवेदन दिले आहे. पोलिसांनी विविध टीम बनवून आरोपीचा शोध सुरु केला आहे. गेल्या आठवड्याभरात कल्याण डोंबिवली परिमंडळ 3 हद्दीतील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत 7 ते 8 रिक्षा चोरीला गेल्या आहेत.