कचरा टाकण्यावरुन वाद, धारदार शस्त्राने तीन भावांकडून तरुणाची हत्या

कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून सख्या तीन भावांनी एका तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. (kolhapur young boy murder)

कचरा टाकण्यावरुन वाद, धारदार शस्त्राने तीन भावांकडून तरुणाची हत्या
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 7:39 AM

कोल्हापूर : कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून सख्या तीन भावांनी एका तरुणाची हत्या केल्याची (murdere) खळबळजनक घटना घडली आहे. कोल्हापूरमधील  क्रांतीसिंह नाना पाटील नगरामध्ये बुधवारी मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. आकाश वांजळे असे मृत तरुणाचे नाव असून भारत कचरे, दिलीप कचरे आणि सुरेश कचरे अशी संशयितांची नावं आहेत. (25 year old young boy murdered in kolhapur, three arrested)

मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरमधील क्रांतीसिंह नाना पाटील नगरामध्ये वांजळे आणि कचरे अशी दोन कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहतात. या दोन्ही कुटुंबामध्ये मगील काही दिवसांपासून मतभेद निर्माण झाले होते. काल बुधवारी सायंकाळी कचरा टाकण्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यांनतर हा वाद विकोपाला गेल्यानंतर तीन संशयित आणि मृत तरुण यांच्यामध्ये बुधवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. संशयित भारत कचरे, दिलीप कचरे आणि सुरेश कचरे या तिघांनी आकाश वांजळे (वय 25) याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात आकाश वांजळे गंभीर जखमी झाला. त्यानंतर वांजळे याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, आकाश वांजळे याच्या मृत्यूनंतर त्याचे मित्र आणि नातेवाईक शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात जमले होते. उपचार करताना आकाश वांजळे याचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. ही घटना कळताच करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच, रुग्णालयातदेखील पोलीस तैनात करण्यात आले होते. या घटनेचा तपास करवीर पोलिसांकडून सुरु असून तीन संशयितांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात अनाथ अल्पवयीन मुलीचं दिल्लीतील तरुणाशी लग्न लावण्याचा प्रयत्न, पोलिसांची कारवाई

पतीच्या उपचारासाठी तांत्रिकाकडे धावा, कोल्‍ड ड्र‍िंकमधून नशेचं औषध देत महिलेवर बलात्कार

आधी आदिवासी मुलीवर बलात्कार, तीन महिन्यांनी जामिनावर सुटल्यावर विधवेवर बलात्कार, मध्यप्रदेशातील धक्कादायक घटना

(25 year old young boy murdered in kolhapur, three arrested)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.