बेंगळुरू : देशात अनेक ठिकाणी पोलिस छापेमारी करीत असतात. अनेकदा लोकांच्या डोक्याला शॉक लागेल अशा घटना उघडकीस येतात. बेंगळुरूमध्ये (BENGALURU) पोलिसांनी बुधवारी शहरातील व्यावसायिकाकडून 225 किलो वजनाच्या आणि 6 लाख रुपये किमतीच्या संशयित गांजा मिश्रीत चॉकलेटच्या 10 बॅग जप्त केल्या. विशेष म्हणजे पोलिसांनी (BENGALURU POLICE) ज्यावेळी कारवाई केली. त्यावेळी 10 पिशव्यांमध्ये सुमारे 26 हजार चॉकलेट्स (ganja-laced chocolates) होती अशी माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. हे प्रकरण उजेडात आल्यापासून शहरात मोठी खळबळ माजली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव व्यापारी शमीम अख्तर असं आहे. त्याला बुधवारी सायंकाळच्या सुमारास संशय आल्याने ताब्यात घेतले आहे. बेंगळुरू शहरात म्हैसूर रोडपासून जवळ यशवंत पूरच्या आरएमसी यार्डजवळ, वाहतूक करत असताना पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्याला ताब्यात घेतले आहे.पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी हा साडी विकण्याचं काम करतो. आरोपी अख्तरने पोलिसांना उत्तर प्रदेशातील कानपूर येथून चॉकलेट मिळाल्याचे सांगितले. सध्या जी चॉकलेट आरोपीकडं सापडली आहेत. ती चॉकलेट व्यवस्थित पॅक करुन रेल्वेच्या मार्गाने शहरात पाठवली जातात. अख्तर शहराच्या विविध भागात किराणा दुकान मालकांना विकण्याचा विचार करत होता अशी माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर तिथल्या तीन किराणा दुकान मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने कुणाला माल विकला असल्याचं पोलिसांना तात्काळ सांगितलं. पोलिसांनी त्या दुकान मालकांची चौकशी सुरु केली आहे.
पोलिसांनी ज्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे, त्याने पोलिसांना सांगितलं आहे की, दुकान मालकांनी स्वत:हून त्याच्याशी संपर्क साधला आहे. त्यानंतर त्याला युपीतून गांजा मिश्रीत चॉकलेट आणण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर अख्तरने पोलिसांना सांगितलं की, रोजंदारीचं काम करणाऱ्या लोकांमध्ये हे चॉकलेट खरेदी करण्याचं प्रमाण अधिक आहे.