चेन्नई | 23 ऑगस्ट 2023 : मित्रांसोबत बिर्याणी खायला जाणे एका तरूणाच्या जीवावरच बेतले. बिर्याणी वरून झालेल्या वादानंतर (dispute over biryani) तीन मद्यधुंद आरोपींनी एका व्यक्तीचा जीव घेतल्याने (crime news) एकच खळबळ माजली आहे. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. बालाजी (वय 22) असे मृत तरूणाचे नाव आहे. शनिवारी रात्री चेन्नईमध्ये ही खळबळजनक घटना घडली.
मृत तरूण बालाजी हा एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. शनिवारी रात्री तो त्याच्या मित्रांसह डिनरसाठी बाहेर पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी व त्याचे मित्र जेव्हा दुकानातून बिर्याणी विकत घेत होते, तेव्हाच तेथे मद्यधुंद अवस्थेतील तीन व्यक्ती पोहोचल्या आणि ते भांडू लागले. त्यांनीही दुकानातून बिर्याणी ऑर्डर केली होती, मात्र दुकानदाराने बालाजी याला प्रथम बिर्याणी दिली. त्यानंतर त्या व्यक्तींनी बालाजीशी वाद घालत त्याला मारहाण केली आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
बिरयानी पर विवाद, 3 लोगों ने युवक का बीच सड़क पर मर्डर किया
घटना चेन्नई की!#Chennai #biryani pic.twitter.com/hJ1zzu8pJX— rajni singh (@imrajni_singh) August 22, 2023
तिघांपैकी एक हल्लेखोर रस्त्याच्या मधोमध चालत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्याचवेळी गाडीतील काही लोकांनी हा हल्ला होताना पाहिला, पण कोणीही समोर येऊन त्यांना रोखण्याचे धाडस दाखवले नाही. त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या घटनेनंतर बालाजीला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.