Reels च्या नादात Real आयुष्य गमावलं ! नदीकिनारी करत होते शूटिंग, पाय घसरला अन्

लोकांच्या डोक्यात व्हिडीओ बनवण्याचं खूळ एवढं आहे की त्या नादात ते स्वत:च्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. रील्स बनवताना नदीत पाय घसरून पडल्याने तीन तरूणांसोबत अशीच दुर्घटना घडली.

Reels च्या नादात Real आयुष्य गमावलं ! नदीकिनारी करत होते शूटिंग, पाय घसरला अन्
बुलढाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 5:10 PM

पाटणा : नजर हटी तो दुर्घटना घटी…. हे वाक्य काही केवळ गाडी चालवताना किंवा प्रवासातच लक्षात ठेवायचे नसते तर रोजच्या आयुष्यातही त्याचा अवलंब करायचा असतो. आजची पिढी खूप टेक्नोसॅव्ही आहे. सतत काही ना काही उद्योग सुरू असतात. त्यातच सध्या सोशल मीडियावर रिल्स (reels) आणि व्हिडीओ (videos on social media) बनवण्याचा खूप ट्रेंड आहे. विशेषतः तरुण मुलांमध्ये त्याची खूपच क्रेझ आहे.

मात्र रील बनवण्याच्या आणि काहीतरी नवीन करण्याच्या इच्छेने ते अशी काही पावलं उचलतात, जे त्यांच्यासाठीच खूप घातक ठरते. असाच एक दुर्दैवी प्रकार बिहारमधील मोतिहारीमध्ये घडला आहे. तेथे रील बनवण्याच्या नादात तीन अल्पवयीन मुलांना जीव गमवावा लागला आहे. चंपारण येथील टिकुलिया गावातील नदीच्या काठावर ही मुलं यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ बनवत होती. मात्र तेवढ्याच त्यांचा पाय घसरून ते नदीत पडले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला.

एसडीआरएफच्या पथकाने शोधमोहिम हाती घेत त्यांचे मृतदेह शोधून काढले. मनजीत, पियुष कुमार आणि प्रिन्स अशी मृत मुलांची नावे आहेत. ते १४-१५ वयोगटातील होते. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

एकाला वाचवताना इतर दोघेही बुडाले

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तीनही मुलं नदीच्या काठावर रील बनवत होते. यादरम्यान एका मुलाचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी इतर दोघांनी नदीत उडी मारली मात्र तेही बुडाले. त्या तिघांना वाचवण्यासाठी स्थानिकांनी खूप प्रयत्न केले, मात्र त्यांना अपयश आले.

SDRF टीमने शोधले मृतदेह

तीनही मुलांचे मृतदेह शोधण्यात गावकऱ्यांना यश मिळाले नाही त्यामुळे SDRF च्या टीमला पाचारण करण्यात आले. त्यांनी तब्बल १० तास मेहनत केल्यानंतर तीनही मुलांचे मृतदेह सापडले. ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.