सख्खे भाऊच बनले पक्के वैरी…बहिणीचे पाय बांधून तिला तलावात फेकलं… त्यांनी असं का केलं ?

सख्ख्या भावांनीच बहिणीची हत्या केली. एवढेच नव्हे तर मृतदेहाचे पाय बांधून तो तलावात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयावरून हे थरकाप उडवणारे कृत्य घडल्याचे समोर आले आहे.

सख्खे भाऊच बनले पक्के वैरी...बहिणीचे पाय बांधून तिला तलावात फेकलं... त्यांनी असं का केलं ?
कौटुंबिक वादातून मेव्हण्याने भावोजीला संपवले
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 9:38 AM

जयपूर : भय्या मेरे राखी के बंधन को निभाना… असं म्हणतं प्रत्येक बहीण प्रेमाने आपल्या भावांना राखी बांधते, ओवाळतेही. मात्र बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देणाऱ्या भावांनीच (brother killed sister) तिचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भावा-बहिणीच्या नात्यावरचा विश्वास उडावा अशी ही खळबळजनक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. भावांनी त्यांच्या सख्ख्या बहिणीलाच संपवलं.

राजस्थानधील धौलपूर येथे राहणाऱ्या तीन भावांनी त्यांच्या बहिणीची हत्या केली. एवढंच नव्हे तर तिचे पाय बांधून तिच मृतदेह तलावात फेकून देण्यात निर्घृण कृत्यही त्यांनी केले. बहिणीचे अवैध संबंध असल्याच्या संशयावरून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. मृत महिलेच्या दिराच्या फिर्यादीवरून त्या महिलेच्या भावांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजस्थानमधील धौलपूर येथील बसई डांग पोलीस स्टेशन हद्दीतील निभी का ताल येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तिच्या तीन सख्ख्या भावांवरच महिलेच्या हत्येचा आरोप आहे. याप्रकरणी त्या महिलेच्या दीराने फिर्याद नोंदवली दिली आहे. महिलेच्या अवैध संबंधामुळे भावांनी तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

माहेरी नेण्यासाठी आले होते भाऊ

अनिता प्रजापती असे मृत महिलेचे नाव असून ती आग्रा येथे रहात होती. तिचा पती मानसिकदृष्ट्या आजारी होता , त्यामुळे ती आग्र्यातच भाड्याच्या घरात रहात होती. तेथे तिची एका दुसऱ्या भाडेकरूशी ओळख झाली व त्यांचे विवाहबाह्य संबंध होते. तिच्या माहेरच्यांना याबद्दल कळल्यावर तिच्या भावांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने कोणाचेच ऐकले नाही, ना तिच्यावर काही परिणाम झाला.

22 जून रोजी तिचे तीन भाऊ तिला माहेरी नेण्यासाठी आले होते. मात्र त्यानंतर शुक्रवारी एका तलावत तिचा मृतदेहच आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. तिचे पाय बांधलेले असल्याने पोलिसांना हत्येचा संशय आला. नंतर महिलेची ओळख पटताच तिच्या भावांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोस्टमॉर्टमनंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.