बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवून घराकडे निघाले अन् वाटेत… पालघरच्या तिघांचा अपघातात मृत्यू; कारचा चेंदामेंदा

गुजरातमध्ये वारंवार अपघातांची घटना घडत असतात. अशाच एका दुर्घटनेची घटना भरुचमध्ये घडली आहे. भरुचच्या नेशनल हायवे 48 वर एक भयंकर अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.

बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवून घराकडे निघाले अन् वाटेत... पालघरच्या तिघांचा अपघातात मृत्यू; कारचा चेंदामेंदा
पालघरच्या तिघांचा अपघातात मृत्यू; कारचा चेंदामेंदा
Follow us
| Updated on: Jan 08, 2025 | 12:10 PM

अजमेरला उरूस सुरू आहे. त्यामुळे अजमेरच्या बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवण्यासाठी हजारो भाविक अजमेरमध्ये दाखल झाले आहेत. पालघर जिल्ह्यातूनही काही लोक नेहमीप्रमाणे अजमेरला गेले आहेत. सात जणांचा एक ग्रुपही बाबांच्या दर्ग्यावर माथा टेकवण्यासाठी आणि चादर चढवण्यासाठी गेला होता. पण त्यातील तिघे परतलेच नाहीत. पालघरकडे येत असताना गुजरातमध्येच त्यांच्यावर काळाने घाला घातला. कार अपघातात या तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला. अपघात पाहून अनेकांच्या अंगावर अक्षरश: शहारे आले.

राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यावरून परतीच्या प्रवासा दरम्यान गुजरात राज्यातील भरूच येथील अंकलेश्वर भागात बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पालघर तालुक्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयान बाबा चोगले (रा. मनोर), ताहीर नासिर शेख (रा. पालघर) आणि मुदस्सर अन्सार पटेल (रा. टाकवहाल) अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर सलमान अल्ताफ शेख, शाहरुख सलीम शेख, शादाब मलिक शेख आणि मोईन सलीम शेख सर्व (रा. काटाळे) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भरूच परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कसा झाला अपघात?

पालघर येथे राहणारे एकाच कुटुंबातील सात जण अजमेरहून मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. गुजरातच्या भरूचमधील अंकलेश्वर येथील बाकरोल ब्रीज जवळ हा अपघात झाला. वेगाने येणारी आर्टिगा कार ट्रकमध्ये घुसली. ही धडक अत्यंत जोरदार होती. त्यामुळे या कुटुंबातील 7 पैकी 3 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या स्थानिकांनी त्वरित मदतीसाठी धाव घेतली. 108 क्रमांकावर फोन करून अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केलं. अग्निशनम दलाचे जवान आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी क्रेनच्या मदतीने जखमींचे रेस्क्यू केले.

दरम्यान, हा अपघात अत्यंत भयानक होता. अपघातातील कारचा चक्काचूर झाला आहे. कारचे प्रत्येक पार्ट डॅमेज झाले आहेत. ही कार पाहिल्यानंतर अपघातातील कोणी वाचूच शकणार नाही, असं वाटावं अशी कारची अवस्था झाली आहे. ही कार उचलण्यासाठी क्रेन मागवावी लागली. क्रेनच्या मदतीने कार उचलून कारमधील जखमींना बाहेर काढण्यात आलं.

4 जणांची स्थिती गंभीर

अंकलेश्वरच्या बाकरोल जवळ ही भीषण घटना घडली. कारमध्ये बसलेले इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी भरुचच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले गेले आहे. पोलीस आणि आपत्कालीन सेवांच्या टीमने घटनास्थळी तातडीने पोहोचून मदत दिली.

पोलीस काय म्हणाले?

कारची धडक इतकी भयंकर होती की कारचा चक्काचूर झाला आहे. कार नावाला शिल्लक उरली आहे. हा अपघात अत्यंत भीषण असल्याने जखमींना वाचवण्यासाठी क्रेनही बोलवावी लागली. अपघातानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आता वाहतूक सुरळीत आहे, असं पोलिसांनी सांगितलं. तसेच या प्रकरणी पंचनामा करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

आणखी एक अपघात

दुसरीकडे, बनासकांठा जिल्ह्यात कांकरेजच्या थरा-हारीज रस्त्यावर देखील एक अपघात झाला. या अपघातात बाईक आणि ट्रॅक्टर यांच्यात धडक होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला. बाईकवर असलेले दोन्ही युवक अपघातात मरण पावले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.