Baba Siddiqui Murder : 3 महिन्यांपूर्वी कट रचला, YouTube पाहून गोळीबार शिकले… बाबा सिद्दीकींच्या हत्येचा प्लान कसा रचला ?

Baba Siddiqui Case : राजकारणी बाबा सिद्दीकी यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत चौघांना अटक केली असून अनेक नवनवे खुलासे होत आहेत. काल अटक करण्यात आलेला चौथा आरोपी हरीशकुमार याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तीन महीने आधीच पबाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. शूटर्सनी गोळी चालवण्याचे प्रशिक्षण कुठून घेतलं ? त्यांना हत्येसाठी किती पैसै मिळाले ? यासराख्या अनक महत्वपूर्ण गोष्टींचा खुलासा आता पोलीस तपासात होत आहे.

Baba Siddiqui Murder :  3 महिन्यांपूर्वी कट रचला, YouTube पाहून गोळीबार शिकले... बाबा सिद्दीकींच्या हत्येचा प्लान कसा रचला  ?
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी 3 महिने प्लानिंग सुरू होतं.
Follow us
| Updated on: Oct 16, 2024 | 8:36 AM

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते , माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी, वांद्रे येथे भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुंबईसारख्या शहरात झालेल्या या हत्याकाडांने कायदा-सुरक्षाव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाल्याचं पहायला मिळत आहे. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या दोघांना तातडीने अटक करण्यात आली. तर हत्येचा कट रचणाऱ्या आणखी एका आरोपीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. तर काल (मंगळवारी) याप्रकरणी हरीशकुमार बालकराम या चौथ्या आरोपीलाही बेड्या ठोकण्यात आल्या. तो इतर आरोपींसाह पुण्यात स्क्रॅप डीलर म्हणून काम करत होता. त्याने या हत्याकांडासाठी पैसे आणि इतर गोष्टी पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी एकूण चार आरोपी आत्तापर्यंत पोलिसांच्या ताब्यात असून गोळीबार करणारा मुख्य आरोपी शिवकुमार, तसेच हत्येचा मास्टरमाईंड झिशान आणि हत्याकांडाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईने घेतल्याचे सांगत सोशल मीडियावर पोस्ट करणार शुभम लोणकर हे अद्यापही पोलिसांना चकमा देत फिरत आहेत. त्यांच्या शोधार्थ अनेक पथके पाठवण्यात आली आहेत.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची पोलीस कसून चौकशी करत असून त्यामधून बरेच खुलासे झाले आहेत, धक्कादायक माहितीदेखील समोर आली आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचा कट तीन महिन्यांपूर्वीच पुण्यात रचण्यात आला होता, असे चौकशीतून समोर आले आहे. मात्र साबरमती की हरियाणा, कोणत्या जेलमधून हत्येची सुपारी देण्यात आली, याचा तपास सुरू आहे.,शूटआऊट कसं करायचं याचं प्रशिक्षण शूटर्सनी Youtube वरून घेतल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. त्यानंतरच 12 ऑक्टोबरला ही हत्या झाली. सिद्दीकी हत्याप्रकरणात नुकताच अटक करण्यात आलेला चौथा आरोपी हरीशकुमार याने हा सर्व खुलासा केला आहे.

अवघ्या 2 लाख रुपयांसाठी हे भयानक हत्याकांड करण्यासाठी शूटर्स तयार झाले. शूटर्सना या हत्येसाठी अवघे 50 -50 हजार रुपये मिळाले. सोशल मीडियावरील मेसेजिंग ॲपद्वारे शूटर्स एकमेकांच्या संपर्कात होते, संवाद साधत होते.

हे सुद्धा वाचा

आरोपी हरीशकडून महत्वपूर्ण खुलासे

हरीशकुमार बालकराम (वय 23) या चौथ्या आरोपीला काल ( मंगळवार) अटक करण्यात आली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून पुण्यात इतर आरोपींसोबत स्क्रॅप डीलर म्हणून काम करत होता. काल पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या चौकशीत अनेक महत्वाचे खुलासे झाले आहेत. ‘ बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या घराबाहेरच हत्या करण्याचा प्लान होता, त्यासाठी अनेक वेळा रेकीही करण्यात आली, मात्र ते ( हत्या) शक्य झाले नाही. गेल्या 28 दिवसांत मारेकऱ्यांनी 5 वेळा रेकी केली. त्यापूर्वी 3 महिन्यांपासून ते सिद्दीकी यांच्यावर नजर ठेवून होते. कोणालाही संशय येऊन नये म्हणून हे मारेकरी अनेकवेळा सिद्दीकी यांच्या घरापर्यंत पोहोचले होते.’, असे त्याने सांगितल्याची माहिती मिळत आहे.

‘आतापर्यंत हत्या करणाऱ्या शूटर आणि हॅन्डलरला अटक करण्यात आली आहे. मात्र त्यांचा ऑपरेटर कोण आहे, याचा तपास सुरू आहे. हँडलर आणि शूटरच्या जबानीवरून हे स्पष्ट झाले आहे की 3 महिन्यांपूर्वी पुण्यात आदेश मिळाल्यानंतर हत्येचा कट रचला गेला, त्यानंतर त्या दृष्टीने काम सुरू करण्यात आलं. सर्व बाबी निश्चित झाल्यानंतर, शूटर महिनाभरापूर्वी मुंबईतील कुर्ला येथील त्यांच्या भाड्याच्या घरी शिफ्ट झाले. पण गोळीबाराच्या या कटाचा आदेश पंजाब कारागृहातून आला होता की साबरमती तुरुंगातून आला होता हे स्पष्ट झाले नाही’, असं पोलिसांनी नमूद केलं.

15 जणांचे जबाब नोंदवले

याप्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत एकूण 15 जणांचे जबाब नोंदवले आहेत. क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपी हरीशने पैशांपासून ते दुचाकीपर्यंतची व्यवस्था केली होती. तो नेमबाजांसाठी मधला माणूस (middle man) म्हणून काम करत होता. नेमबाज शिवकुमार, गुरनेल आणि धरमराज यांना एकूण दोन लाख रुपये देण्यात आले. त्यांच्या राहण्या-खाण्यासाठी आणि इतर खर्चासाठी ही रक्कम अटक करण्यात आलेल्या प्रवीण लोणकरचा भाऊ शुभम लोणकर याने दिली होती.

अटक करण्यात आलेला आरोपी हरीश याला या घटनेची संपूर्ण माहिती होती. पुण्यात शूटर्सना त्यानेच बाबा सिद्दीकी यांचा फोटो दिला होता. पण तोपर्यंत बाबा सिद्दीकी कोण होते आणि त्यांचे प्रोफाईल काय हे नेमबाजांना हे माहीत नव्हतं. हरीश हा 9 वर्षांपासून पुण्यात राहत होता. त्याला मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती होती, त्यामुळे तो या हत्येचा प्लानिंगमध्ये सहभागी झाला. गोळीबार करणाऱ्यांना रोख रक्कम तसेच मोबाईल देण्यात आले होते.

YouTube वरून घेतलं गोळीबाराचं प्रशिक्षण

युट्यूबवरील (YouTube) गुन्हेगारी घटना आणि मालिका पाहून गोळीबार करण्यास शिकल्याचं शूटर्सनी पोलिसांन सांगितलं. आत्तापर्यंत 4 आरोपींना अटक केली असली तरी 3 मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत. यामध्ये शुभम लोणकरला अटक झाल्यास आणखी अनेक नावे समोर येतील आणि आरोपींची यादी वाढेल, अनेक महत्वपूर्ण खुलासे होतील.

Non Stop LIVE Update
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.