मावळत्या वर्षाला निरोप देताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघे ठार झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर
31 डिसेंबरला मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर जेवायला गेलेल्या एका कुटुंबासाठी ते जेवण अखेरचं ठरलं. जेवून परत येताना त्यांच्या दुचाकीला ट्रकने उडवल्याने भीषण अपघात झाला आणि तिघजण मृत्यूमुखी पडले. नातलगांकडे जात असतानाच वाटेतच त्यांना काळाने गाठल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
31 डिसेंबरला मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर जेवायला गेलेल्या एका कुटुंबासाठी ते जेवण अखेरचं ठरलं. जेवून परत येताना त्यांच्या दुचाकीला ट्रकने उडवल्याने भीषण अपघात झाला आणि तिघजण मृत्यूमुखी पडले. नातलगांकडे जात असतानाच वाटेतच त्यांना काळाने गाठल्याने हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या कुटुंबियांच्या शोकालातर पारावार उरलेला नाही. दुचाकीवरून रस्ता ओलांडण्याच्या नादात भरधाव ट्रकने भीषण धडक दिल्याने पती-पत्नी व एक मुलगी ठार झाली, तर एक सात वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. सतीश भाऊराव नागपुरे (५१), मनीषा सतीश नागपुरे (४६) व मायरा राहुल नागपुरे (३) असे मृतांचे नाव आहे. तर अवघ्या 7 वर्षांची एक मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
31 डिसेंबर, मंगळवारी रात्री भद्रावती शहरा लगत चंद्रपूर- नागपूर हायवे वर ही दुर्घटना घडली. सतीश नागपुरे हे कुटंबासह जेवण करून नातेवाईकांकडे जात होते. मात्र दुचाकीवरून जात असतानाच हायवेवर यू टर्न घेताना समोरून येणाऱ्या एक ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये मनीषा सतीश नागपुरे (४६) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेले सतीश नागपुरे आणि मायरा यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या अपघातात स्मायली कामतवार ही मुलगी जखमी असून तिच्यावरही उपचार सुरू आहेत. 31 डिसेंबरच्या रात्रीच हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
वाढदिवसासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाचा गुंडाकडून खून
छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्ष नगर परिसरात एक भयानक घटना घडली आहे. सुरवाडीच्या कुटुंबातील वाढदिवसासाठी आलेल्या जावयाचा नशेत धुंद असलेल्या गुंडाने छातीत चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रणजीत सुधाकर दांडगे (वय 39) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हर्ष नगर येथे रात्रीच्या वेळी ही घटना घडली आहे. चाकूने भोसकून खून केल्यानंतर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानंतर त्याने हाताचा अंगठा वर करून इशाराही केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील गुन्हेगारी आणि नशेखोरीवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत असून सामान्य नागरिक मात्र दहशतीखाली असून जीव मुठीत धरून जगत असल्याचे दिसत आहेत.