Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Theft : कल्याण डोंबिवलीत चोरांचा सुळसुळाट, एकाच दिवशी तीन घरफोड्या, एकूण 4.36 लाखांचा ऐवज लंपास

कल्याण पश्चिमेतील एकाच सोसायटीतील दोन घरे चोरट्यांनी फोडली. तर तिसरी घटना कल्याण-शीळ मार्गावरील सोनारपाडा गावात घडली आहे. दिवसाढवळ्या चोरांनी सोसायटीत घुसखोरी करुन घरफोड्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Kalyan Theft : कल्याण डोंबिवलीत चोरांचा सुळसुळाट, एकाच दिवशी तीन घरफोड्या, एकूण 4.36 लाखांचा ऐवज लंपास
कल्याण डोंबिवलीत चोरांचा सुळसुळाट, एकाच दिवशी तीन घरफोड्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 11:56 PM

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत चोरांचा सुळसुळाट झाला असून, शनिवारी दिवसभरात घरफोडी (Robbery)चे तीन गुन्हे कल्याण-डोंबिवलीतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. ही तीन घरे फोडून चोरट्यांनी 4 लाख 36 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे. चोरी (Theft)च्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण पश्चिमेतील एकाच सोसायटीतील दोन घरे चोरट्यांनी फोडली. तर तिसरी घटना कल्याण-शीळ मार्गावरील सोनारपाडा गावात घडली आहे. दिवसाढवळ्या चोरांनी सोसायटीत (Society) घुसखोरी करुन घरफोड्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

कल्याण पश्चिमेत एकाच सोसायटीतील दोन घरे फोडली

पहिली घटना कल्याण पश्चिमेकडील संपदा हॉस्पीटलजवळ असलेल्या विघ्नहर सोसायटीत घडली आहे. या इमारतीत ॲड. राठोड हे तळमजल्यावर राहतात. शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ॲड. राठोड घर फोडून चोरट्यांनी 2 लाख 85 हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला. तर त्याच सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या अभय सिंग यांचे घर फोडून चोरांनी 95 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज लांबविला. या दोन्ही घरांच्या दरवाज्यांना असलेले कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी घरातील मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 70 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी सपोनि देविदास ढोले अधिक तपास करत आहेत.

तिसरी घटना डोंबिवलीत कल्याण-शीळ मार्गावर घडली

तर तिसरी घटना डोंबिवलीतील कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या सोनारपाडा गावातील शंकरनगरामध्ये शांताराम सदन नामक इमारतीत राहणारे गोविंद धोंडू उनवरकर यांच्या तक्रारीनुसार मनपाडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे शनिवारी मध्यरात्री पहाटे दोन ते सकाळी आठच्या दरम्यान चोरट्यांनी कडी-कोंडा तोडून या घरातून 66 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर उनवरकर यांनी ही तक्रार दाखल केली. याप्रकरणी सपोनि अनिल भिसे अधिक तपास करत आहेत. (4.36 lakhs was stolen by burglarizing three houses on the same day in Kalyan Dombivli)

हे सुद्धा वाचा

...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप.
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप.
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण.
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका.
कोणी कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही; राऊतांन
कोणी कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही; राऊतांन.
केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले
केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले.
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल.
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न.
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने.