व्हियाग्राचा ओव्हरडोस, अल्पवयीन मुलीशी रिलेशन ठेवताना हार्ट अटॅक; रुग्णालयात जाण्यापूर्वीच…
मुंबईतील ग्रँट रोड येथे एका भयानक, तितकीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेथे एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवतानाच 41 वर्षांच्या एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला.
मुंबईतील ग्रँट रोड येथे एका भयानक, तितकीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेथे एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवतानाच 41 वर्षांच्या एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या महितीनुसार, मृत इसम 41 वर्षांचा होता. तो एका डायमंड फॅक्टरीचा मॅनेजर होता. 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे त्याचाविरोधात POCSO कायद्याअंतर्गत अत्याचार आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मृत इसम हा त्या पीडित मुलीला गुजरातमधून घेऊन आला होता. शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर हॉटेलमधील कर्मचारी त्यालाा तातडीने रुग्णालयात घेऊन गेले, मात्र तेथे काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीची आई मुंबईत आली. मृत इसम त्या मुलीला फूस लावून, खोटे आश्वासन देऊन मुंबईला घेऊन आला होता, असे तिच्या आईने सांगितले, अशी माहिती डीबी मार्ग पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
लहान मुलींचे लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या अनेक घटना रोज समोर येत आहेत. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी दिल्लीतील रोहिणी येथे एका बनावट तांत्रिकाने प्रथम एका निष्पाप सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास तिच्या आजारी वडिलांचा मृत्यू होईल, अशी धमकी मुलीला देण्यात आली. एवढेच नाही तर तांत्रिकाने मुलीला 51 रुपयेही दिले. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपी तांत्रिकाला अटक केली.