बेडमध्ये 3 मृतदेह, तर आई-वडील जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात, भयानक हत्याकांडाने शहर हादरलं

मेरठच्या लिसाडी गेटच्या सुहैल गार्डन कॉलनी मध्ये हृदयाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 5 लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचा समावेश आहे. घराचं दार बाहेरून लॉक होतं आणि आतलं सामान सगळं अस्ताव्यस्त पसरलं होतं.

बेडमध्ये 3 मृतदेह, तर आई-वडील जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात, भयानक हत्याकांडाने शहर हादरलं
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 7:58 AM

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात गुरुवारी रात्री रक्तरंजित घटनेने खेळाने खळबळ उडवून दिली. लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुहेल गार्डन कॉलनीत एका घरात पाच मृतदेह पडले होते. तीन मृतदेह बेडच्या आत तर दोघांचे मृतदेह जमिनीवर पडले होते. एकाच कुटुंबातील पाच लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचा समावेश असून त्यातील एक मुलगी तर अवघी वर्षभराची आहे. त्यांचा मृतदेह गोणीत भरून बेडमध्ये कोंबण्यात आला होता. त्या सर्वांची एवढी भयानक, क्रूर हत्या कोणी केली हाच प्रश्न सध्या सर्वांनाच भेडसावत आहे. एवढ्या सहज घरात घुसून पाच खून करून आरोपी निघून गेला आणि कोणालाही काहीच समजलंदेखील नाही ? असाही सवाल लोकांच्या मनात घोळत आहे.

मृतांमध्ये मोइन, आसमा आणि त्यांच्या तीन मुली अफ्सा (8), अजीजा (4) आणि अदीबा (1) यांचा समावेश आहे. आरोपींनी पती-पत्नीची हत्या करून त्यांचा मृतदेह जमिनीवर टाकला होता, तर त्यांच्या तीनही मुलींची हत्या केल्यावर त्यांचे मृतदेह त्याचखोलीतील बेडच्या आतमधील बॉक्समध्ये ठेवले होते. यामध्ये अदीबाचा मृतदेह गोणीत भरून बेडच्या आत ठेवण्यात आला होता. मोईनच्या घरातील सामानही विखुरले होते. त्यामुळे हे पाच खून दरोड्याच्या उद्देशाने झालेत का ? या अनुषंगानेही पोलिस तपास करत आहेत.

घराचं दार बाहेरून लॉक

गुरुवारी रात्री मोईनचा भाऊ सलीम पत्नीसह घरी पोहोचला तेव्हा हा निर्घृण खून उघडकीस आला. घराचे दार बाहेरून बंद होते. बुधवारपासून कुटुंबातील एकही सदस्य दिसला नसल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. सलीमने जोर लावून दरवाजा तोडला पण आतील दृश्य पाहून तो हादरला. मोईन आणि आसमा यांचे मृतदेह खोलीतील फरशीवर पडलेले होते, तर तिन्ही मुलींचे मृतदेह बेड बॉक्समध्ये लपवून ठेवण्यात आले होते. सर्वात लहान मुलगी अदीबाचा मृतदेह गोणीत बांधलेला आढळून आला. या हत्येची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. श्वानपथकाच्या मदतीने सुगावा गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

CCTV फुटेजचा पोलीसांकडून तपास सुरू 

हे हत्याकांड घडलं तिथे, त्या घरातील सामान अस्ताव्यस्त पसरले होते, त्यामुळे घरात दरोड्याचा प्रयत्न झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, या पाच लोकांच्या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घराभोवती लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलीस तपासत आहेत. कुठून तरी एखादा क्ल्यू हाथी मिळेल याची अपेक्षा आहे. घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने आरोपी दरवाजाला कुलूप लावून निघून गेला असावा असा आअंदाज आहे. मृत मोईन हा मिस्त्री म्हणून काम करत होता, त्याचे कोणाशी काही शत्रुत्व होते का याचाही पोलिस शोध घेत आहेत . एक मोठा कट आखून 5 लोकांची ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीनेच हत्या केल्याचा संशय आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.