Pune Crime : दरोडा कधी टाकायचा ? आधी ज्योतिषाकडून काढला शुभ मुहूर्त आणि मग मारला मोठा डल्ला, कोट्यावधींची लूट..

दरोडेखोरांनी ज्या ज्योतिषाशी संपर्क साधला होता, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गुन्हेगारांकडून मोठी रक्कम जप्त करण्यात आली असून पीडित कुटुंबियांचाही जबाब घेण्यात आला आहे.

Pune Crime : दरोडा कधी टाकायचा ? आधी ज्योतिषाकडून काढला शुभ मुहूर्त आणि मग मारला मोठा डल्ला, कोट्यावधींची लूट..
गावदेवी परिसरात वृद्ध महिलेवर हल्ला
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 10:07 AM

पुणे | 22 ऑगस्ट 2023 : विद्येचे माहेरघर अशी ख्याती असलेल्या पुण्यात दरोड्याचा (theft) एक अनोखा आणि तेवढाच हैराण करणारा प्रकार समोर आला आह. तेथे दरोडेखोरांनी दरोडा टाकण्यापूर्वी एका ज्योतिषाशी संपर्क साधून त्याच्याकडून मुहूर्त काढून घेतला. त्यानंतर ज्योतिषाने काढलेल्या मुहूर्तानुसार त्यांनी एका घरात दरोडा टाकला आणि कोट्यावधींची रक्कम (crime) घेऊन ते फरार झाले. मात्र, पोलिसांनी त्यांचा कसून शोध घेत पाचही आरोपींना अखेर अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

ही घटना पुण्याजवळील बारामती येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दरोडेखोर एका घरात घुसले आणि सगळं मौल्यवान सामान घेऊन पळाले. त्यावेळी, घरात पक्त एक महिला होती, बाकीचे सगळे जण काही ना काही कामानिमित्त बाहेर गेले होते. दरोडेखोरांनी त्या महिलेला ओलीस ठेवत तिने आरडाओरडा करून नये म्हणून तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता. सागर गोफाने यांचं ते घर आहे.

पोलिसांनी केली पाचही दरोडेखोरांना अटक

पीडित परिवारातील कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, बदमाश दरोडेखोर 95 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 11 लाखांचे दागिने लुटून फरार झाले. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून सचिन, रायबा, रवींद्र, दुर्योधन उर्फ दीपक आणि नितीन अशी त्यांचे नावे आहेत. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी आपला गुन्हा कबूल केला असून दरोडा टाकण्याआधी आपण ज्योतिषाशी संपर्क साधल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांनी ज्या ज्योतिषाशी संपर्क साधला होता त्यालाही अटक करण्यात आली असून रामचंद्र असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी दरोडेखोरांकडून 76 लाख रुपये जप्त केले असून पीडित कुटुंबियांचाही जबाब घेण्यात आला आहे. उर्वरित पैसे आणि दागिन्यांचे गुन्हेगारांनी काय केले, याचा तपास सुरू आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.