Amravati river : बेबळा नदीत ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेले, 3 जण अद्याप बेपत्ता, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घटना

अमरावती : जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात बेबळा नदीत ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेले. 2 जण वाचले 3 जण अद्यापही बेपत्ता आहेत. पुलावरुन पाणी वाहत असतानाही ट्रॅक्टर घालणे जीवावर बेतले.

Amravati river : बेबळा नदीत ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेले, 3 जण अद्याप बेपत्ता, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घटना
बेबळा नदीत ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेले, 3 जण अद्याप बेपत्ताImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 9:37 PM

अमरावती : जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात बेबळा नदीत ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेले. 2 जण वाचले 3 जण अद्यापही बेपत्ता आहेत. पुलावरुन पाणी वाहत असतानाही ट्रॅक्टर घालणे जीवावर बेतले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा मोळवण दरम्यानची घटना आहे. अक्षय रामटेके (Akshay Ramteke) रा. पळसमंडक, नारायण परतीकी, पळसमंडक या दोघांना बाहेर काढण्यात आल्या. सुरेंद्र डोंगरे (Surendra Dongre), रा. पळसमंडक, शेषराव चावके व मारोती चावके (Maroti Chawke) हे दोघेही धर्मापूर येथील रहिवासी वाहून गेले. या तिघांचा शोध घेण्यात आला. पण, पत्ता लागू शकला नव्हता. अशी माहिती तलाठी राठोड यांनी दिली.

नेमकं काय घडलं

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा मोळवण येथून बेंबळा नदी वाहते. या नदीला पूर आला. ट्रॅक्टर चालकाला पुलावरून जाता येईल, असं वाटलं. त्यामुळं त्यानं पाच जण ट्रॅक्टरवर असले असताना ट्रॅकर पुलावरून काढला. पण, पुराच्या पाण्यामुळं त्याला पुलाचा अंदाज आला नाही. पुलाला कठडे नव्हते. त्यामुळं ट्रॅक्टरचा तोल नदीत गेला. ट्रॅक्टर बुडताना पाहून दोन जण कसेतरी बाहेर पडले. पण, तीन जणांचा अद्याप पत्ता लागला नाही. विशेष म्हणजे याचा व्हिडीओ कुणीतही बाहेरच्या व्यक्तीनं काढला. त्यामुळं पुरात ट्रॅक्टर बुडतानाचा व्हिडीओ घटनेनंतर व्हायरल झाला.

माळू नदीला पूर, चारचाकी गेली वाहून

7 आणि 8 ऑगस्टला अमरावतीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय. यात माळू नदीला मोठा पूर आला आहे. माळू नदी भरून वाहत आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने सालबर्डी येथे भाविकांची मोठी रिघ असते. यातच भाविक माळू नदीच्या बाजूला गाड्या उभ्या करून मंदिरात प्रवेश करतात. अशीच गाडी पुलाच्या बाजूला उभे असताना पुराच्या पाण्यात वाहून गेली. गाडी वाहून जात असताना दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. सुदैवाने या गाडीमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी झालेली नाही.

हे सुद्धा वाचा

संत्रा उत्पादकांना 250 कोटींचा फटका

संततधार पावसाचा अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागांना मोठा फटका बसला. पावसामुळे वरुड-मोर्शीसह आदी तालुक्यातील संत्रा गळला. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अंदाजे 250 कोटींचा फटका बसला. आंबिया बहाराच्या संत्राचा शेतात सडा पडला. संत्रा उत्पादक शेतकरी यंदाही अडचणीत सापडला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.