Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे भामटे पाहिलेच नसतील, टेलिग्रामवरून संपर्क साधला अन् … शेअर ब्रोकरला लावला कोट्यावधींचा चुना !

आजकाल गुन्ह्यांच्या नवनव्या पद्धती समोर येत असून सायबर फ्रॉमुळे अनेक लोकांना आयुष्यभराची कमाई गमवावी लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक फसवणुकीची घटना घडल्याचे समोर आले आहे.

असे भामटे पाहिलेच नसतील, टेलिग्रामवरून संपर्क साधला अन् ... शेअर ब्रोकरला लावला कोट्यावधींचा चुना !
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 9:10 AM

अहमदाबाद | 12 सप्टेंबर 2023 : देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत ऑनलाइन फसवणूक किंवा सायबर फ्रॉडच्या (cyber fraud) घटनांमध्येही वाढ झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशीच एक घटना शेअर ब्रोकरसोबत घडली असून त्याला बदमाशांनी कोट्यावधींचा चुना (lost money) लावला आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या एका शेअर ब्रोकरने सायबर क्राईम पोलिसांकडे (cyber crime) , आपल्यासोबत सायबर फ्रॉड झाल्याची तक्रार नोंदवली आहे. वेगवेगळ्या अज्ञात व्यक्तींनी ‘टास्क फ्रॉड’करून आपली सुमारे 2.50 (अडीच कोटी) कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

कशी झाली फसवणूक ?

जयेश वकील असे फिर्यादी इसमाचे नाव असून ते 51 वर्षांचे आहेत. इसानपुरा भागात राहणारे जयेश हे शेअर मार्केटमध्ये व्यवहार करतात तसेच अकाऊंट सर्व्हिसेसही प्रोव्हाईड करतात. त्यांनी पोलिसांत जाऊन एफआयआर दाखल केली आहे. समीक्षा नावाच्या महिलेने आपल्याशी टेलिग्राम ॲपवरून आपल्याशी संपर्क साधला आणि काही टास्क-रिलेटेड काम करण्याच्या बदल्यात मोबदला ऑफर केला, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले.

घरात बसूनच एका ट्रॅव्हल पोर्टलसाठी एका क्लिकवर काही टास्क्स पूर्ण करून पैसे कमवू शकता, असे प्रलोभन समिक्षा या महिलेने जयेश यांना दाखवले होते. या गोष्टीला राजी झालेल्या जयेश वकील यांनी गुंतवणूक करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना पाठवण्यात आलेल्या एका लिंकद्वारे त्यांनी रजिस्ट्रेशनही पूर्ण केले.

वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केल्यावर त्यांना 11 हजार रुपये मिळाले. त्यानंतर त्यांना विविध प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसना रेटिंग देण्याचे टास्क देण्यात आले होते. अशी 90 टास्क्स पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांची कमाईची पहिली रक्कम म्हणून 1000 रुपये मिळाले. आणखी टास्क्स करायचे असतील तर जास्त गुंतवणूक करावी लागले, असे समीक्षाने त्यांना सांगितले. त्याप्रमाणे जयेश यांनी पैसे गुंतवले. त्यानंतर आणखी 90 टास्क झाल्यावर त्यांना 1,500 रुपये मिळाले.

नंतर जयेश यांना असेही सांगण्यात आले की, डिलक्स टास्क आणि मोबदला मिळवण्यासाठी त्यांना आणखी पैसे गुंतवत राहावे लागतील. त्याप्रमाणे समीक्षा व इतर व्यक्तींनी दिलेल्या सूचनांनुसार, जयेश यांनी 27 जुलै 2023 ते 6 सप्टेंबर 2023 या काळात एकूण 29 ट्रॅन्झॅक्शन्स करत सुमारे 2.46 कोटी रुपये भरले. मात्र त्यानंतरही त्यांना एकही पैसा न मिळाल्याने वकील यांनी सायबर क्राईम पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध आयपीसी अंतर्गत विश्वासभंग, फसवणूक आणि गुन्हेगारी कटाची तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.

टास्क किंवा पार्ट-टाइम जॉबशी संबंधित फ्रॉड्स हे विविध टोळ्यांद्वारे चालवले जातात. त्यांची मोडस ऑपरेंडी सेम असली तरी त्यांचे टास्क्स वेगेवगळे असतात. यामध्ये Google वरील व्यवसाय, उत्पादने किंवा सेवांना रेटिंग देण्यासाठी वेगवेगळे YouTube व्हिडिओ लाइक करणे अशा टास्क्सचा समावेश असतो. सुरूवातील, प्रत्येक टास्कसह पीडित इसमाला लहान रक्कम भरण्यास सांगितले जाते, आणि त्यांचा विश्वास संपाजन करण्यासाठी बक्षीस म्हणून रोख रक्कमही दिली जाते मात्र नंतर त्यांची फसवणूक केली जाते आणि लोकं, त्यांचा कष्टाने कमावलेला पैस गमावून बसतात.

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.