हाफ चिकन फ्राईड राईस महागात, चायनीज खाल्ल्याने विषबाधा, 6 मुलं रुग्णालयात
रस्त्यावरील चायनीज खाल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार उरण शहरात समोर आला आहे. गाडीवरील चायनीज खाल्ल्याने 7 जणांना विषबाधा झाली. यामध्ये 6 मुलांचा समावेश आहे.
रायगड : रस्त्यावरील चायनीज खाल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार उरण शहरात समोर आला आहे. गाडीवरील चायनीज खाल्ल्याने 7 जणांना विषबाधा झाली. यामध्ये 6 मुलांचा समावेश आहे. या सर्वांवर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत उरण पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
उरणमधील एन आय हायस्कूलजवळ हे चायनीज सेंटर आहे. या चायनीज सेंटरवरुन तक्रारदाराने 5 हाफ चिकन फ्राईड राईस पार्सल नेले होते. मात्र हा राईस खाल्ल्यानंतर त्रास होऊ लागला. कुटुंबातील सगळ्यांनाच उलट्या आणि पोटाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने, अनर्थ टळला.
चायनीज खाल्ल्यानेच हा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चायनीज सेंटरच्या मालकावर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
बेकायदा चायनीज सेंटरवर कारवाईची मागणी
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील उरणसह परिसरातील बेकायदा चायनीज सेंटरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. चिकनसह विविध प्रकारच्या डिश इथे उघड्यावर विकलं जातं. मात्र त्यांना कोणतीही परवानगी नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कमी प्रतिचा भाजीपाला, चिकन वापरुन नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचाही आरोप आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
मेळघाटात 10 जणांना अन्नातून विषबधाधा
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथे गेल्या महिन्यात एकाच कुटुंबातील 10 जणांना विषबाधा झाली होती. यात मुलगा आणि वडिलांचा मृत्यू झाला होता. आई लक्ष्मी बछले गंभीर अवस्थेत होते. त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. 7 बालकांना चंद्रज्योतीच्या विषारी बिया खाल्ल्यानं विषबाधा झाली होती.
संबंधित बातम्या
मेळघाटात एकाच कुटूंबातील 10 जणांना विषबाधा, 7 वर्षीय मुलासह वडिलांचा मृत्यू