Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगरमध्ये 6 गावठी कट्टे, 12 जिवंत काडतुसे जप्त; दोघेजण ताब्यात; गावठी कट्टे वापरणाऱ्यांचा शोध सुरू

अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये गावठी कट्टे बाळगणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून गावठी कट्टे वापरणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम घेण्यात आले आहे.

अहमदनगरमध्ये 6 गावठी कट्टे, 12 जिवंत काडतुसे जप्त; दोघेजण ताब्यात; गावठी कट्टे वापरणाऱ्यांचा शोध सुरू
Privet lender Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 11:49 PM

अहमदनगरः अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने 6 गावठी कट्टे आणि 12 जिवंत काडतुसे (cartridges) बेकायदेशीररित्या (Illegally) बाळगणाऱ्या दोन सराईत आरोपींना जेरबंद केलं आहे. या प्रकरणात ऋषीकेश घारे आणि समाधान सांगळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये गावठी कट्टे बाळगणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून गावठी कट्टे वापरणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम घेण्यात आले आहे.

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ऋषीकेश घारे आणि समाधान सांगळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 लाख 86 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कुणी संशयित आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल खटके यांना गुप्त बातमीदारामार्फत ही माहिती मिळाली होती.

गावठी कट्टे वापरणाऱ्यांची संख्या अधिक

कोल्हार येथे ऋषिकेश घारे हा गावठी कट्टे विक्रीच्या उद्देशाने घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला होता. त्यानंतर या दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. गावठी कट्टे वापरणाऱ्यांची संख्या अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी जोरदार मोहीम आखून गावठी कट्टे वापरणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याबरोबरच लवकरच योग्य ती कारवाई करणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनीही सांगितले आहे.

अहमदनगर जिल्ह्या गावठी कट्टे नेमके येतात कुठून याचा शोध घेणंही सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात अजून किती संशयितांचा समावेश आहे याचा शोध अहमदनगर पोलीस घेत आहेत.

संबंधित बातम्या

हातावर मोबाइल नंबर, प्रकृती खंगलेली, जालन्यातील गायब एसीबीचे पोलिस सापडले, पण गूढ आणखी वाढलं

हिजाब-बुरखा घातलेल्या महिलेचे चाकूनं सपासप वार, टॅक्सी चालकावर का केला हल्ला?

मोबाईल हिसकावताना विरोध, टोळक्याने 25 वर्षीय तरुणाचं मुंडकं छाटलं

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.