वृद्ध महिलेच्या हत्येनं मलबार हिल हादरलं, 2 दिवसांपूर्वीच कामावर ठेवलेला नोकर फरार..
ईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील मलबार हिल या पॉश एरिआमध्ये एका वृद्ध महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्योती शाह (63) असे मृत महिलेचं नाव आहे, आणि घटनेच्या वेळी ती घरात एकटीच होती अशी माहिती समोर आली आहे. ज्योती यांचे पती हे ज्वेलरी शॉपचे मालक असून संध्याकाळी ते घरी आल्यानंतर ही हत्या उघडकीस आली.
मुंबई | 13 मार्च 2024 : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील मलबार हिल या पॉश एरिआमध्ये एका वृद्ध महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्योती शाह (63)असे मृत महिलेचं नाव आहे, आणि घटनेच्या वेळी ती घरात एकटीच होती अशी माहिती समोर आली आहे. ज्योती यांचे पती हे ज्वेलरी शॉपचे मालक असून संध्याकाळी ते घरी आल्यानंतर ही हत्या उघडकीस आली. त्यांच्या घरातील नोकरानेच हा खून केला असावा असा पोलिसांना संशय असून तो सध्या फरार आहे. याप्रकरण मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस कसून तपास करत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच कामावर ठेवला होता नोकर
मलबार हिल पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला ही नेपियन सी भागातील एका इमारतीत तिच्या पतीसोबत रहात होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी घरातील कामासाठी एक नोकर ठेवला होता. मात्र ज्योती यांच्या हत्येनंतर त्यांचा नोकर फरार असून त्याचा कुठेच ठावठिकाणा लागत नाहीये. त्यानेच ही हत्या केली असावी असा संशय आहे.
ज्योती यांची गळा आवळून हत्या करण्यात आली असे पोलिसांनी सांगितले. मात्र त्यांची हत्या का झाली ? त्यामागचं कारण काय ? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. घरातील मौल्यवान वस्तू,रोख रक्कम, वगैरे चोरी झाले आहे का याचाही पोलिस शोध आहेत. घटनेच्या दिवशी संध्याकाळी ज्योचती यांचे पती घरी आले. तेव्हा त्यांना ज्योती या बेशुद्धावस्थेत पडलेल्या दिसल्या. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत कळवले.
मुकेश शाह घरी पोहोचले तेव्हा घराचे दार आतून लॉक होते. त्यांच्याकडील एक्स्ट्रॉ किल्ली वापरत शाह यांनी दरवाजा उघडला. बेडरूममध्ये पोहोचल्यानंतर त्यांना ज्योती बेशुद्धावस्थेत दिसल्या. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून तपासणी केली. मात्र तोपर्यंत ज्योती यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मलबार पोलिस स्टेशनमधील अधिकारी अधिक तपास करत आहेत.