मुंबईत प्रतिबंधित ई सिगरेटचा साठा जप्त, फिल्मी स्टाईलने पाठलाग करत आरोपीला अटक

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दक्षिण मुंबईत कारवाई करत 66 लाखांच्या ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला फिल्मी स्टाईलने पाठलाग करत अटक केली आहे.

मुंबईत प्रतिबंधित ई सिगरेटचा साठा जप्त, फिल्मी स्टाईलने पाठलाग करत आरोपीला अटक
मुंबई गुन्हे शाखेकडून ई-सिगारेट्स जप्तImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 12:02 PM

मुंबई / ब्रिजभान जैस्वार : मायानगरी मुंबईत ई-सिगारेटचा गोरखधंदा तेजीत चालला आहे. या महागड्या ई-सिगारेटच्या तस्करीचे रॅकेट मोडीत काढण्यासाठी मुंबई पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. मागील काही दिवसांपासून ई-सिगारेट विरोधात कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे. अलीकडेच काही लाखांचा ई-सिगारेटचा साठा जप्त करुन काही दिवस उलटत नाहीत तोच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी 66 लाख रुपयांचे ई-सिगारेट घबाड हस्तगत केले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर पोलिसांनी ई-सिगारेटची तस्करी उधळण्यासाठी कारवाईची मोहिम तीव्र केली आहे.

दक्षिण मुंबईत कारवाई दरम्यान 66 लाखांची ई-सिगारेट जप्त

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दक्षिण मुंबईतील मस्जिद परिसरात कारवाई करत 66 लाख रुपयांचा ई-सिगारेटचा साठा जप्त केला आहे. ई-सिगारेटची ही जप्ती अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई आहे. शनिवारी 4 मार्च रोजी रात्री पोलीस अधिकारी दक्षिण मुंबईतील मस्जिद परिसरात तपासणी करत असताना त्यांना एक एसयूव्ही गाडी संशयास्पद आढळली. संशयावरून अधिकाऱ्यांनी त्याला तपासणीसाठी गाडी थांबवण्यास सांगितले.

कारचालकासह ई-सिगारेट घेतल्या ताब्यात

मात्र गाडी थांबवण्याऐवजी संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. अधिकार्‍यांनी त्याच्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि काही वेळाने कार थांबवली. अधिकार्‍यांनी गाडीची तपासणी केली असता, त्यांना कारमध्ये अनेक बॉक्स आढळले. बॉक्स उघडल्यावर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित ई-सिगारेट सापडल्या. नंतर पोलिसांनी ई-सिगारेट जप्त करत सदर कारचालकाला ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा

पुणे, नाशिकमध्ये ई-सिगारेटवर कारवाई

राज्यात ई-सिगारेटवरील कारवाई तीव्र करण्यात आली असून, मुंबईसह पुणे, नाशिकमध्येही महिनाभरापूर्वी कारवाई करत ई-सिगारेट जप्त करण्यात आल्या. यात मुंबई, नाशिक, पुणे येथून ई-सिगारेट जप्त करत आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.