वसई – वसईत (Vasai) जिम (GYM) करताना अचानक एका व्यक्तीला चक्कर आली, दवाखान्यात (Vasai hospital) घेऊन जात असताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे. जिम करताना ही घटना घडल्यामुळे सगळीकडे शुकशुकाट होता. त्याचबरोबर जिम करायला येणाऱ्या तरुणांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. काल रात्री जीम करताना ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीचं वय 67 आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
प्रल्हाद निकम असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचबरोबर मयत व्यक्तीचे वय 67 होते. वसईच्या आनंद नगर परिसरातील सेरोजो 11 फिटनेस केंद्रात ही घटना काल रात्री साडे सात वाजता घडली आहे.
जिम मधील काही तरुणांनी निकम यांना चक्कर येताच तात्काळ वसईतील कार्डिनल रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले, पण रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. याबाबत वसईच्या माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अधिक तपास सुरु केला आहे. जिम करतावन अचानक मृत्यू झाल्यामुळे संपुर्ण परिसरात घबराहटीचे वातावरण आहे.