Pune Crime : 7 वर्षांच्या मुलीवर 78 वर्षांच्या नराधमाचा अत्याचार, गळ्याला चाकू लावत…

पुण्यातही असाच धक्कादायक प्रकार झाल्याचेही उघड झालंय. दोन घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या नराधमांनीच चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आलंय. विद्येचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यातून हा प्रकार उघडकीस आला असून अख्खं शहर हादरलं आहे.

Pune Crime : 7 वर्षांच्या मुलीवर 78 वर्षांच्या नराधमाचा अत्याचार, गळ्याला चाकू लावत...
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 8:38 AM

बदलापूरमधील शाळेतील दोन मुलींवर झालेलया अत्याचाराने अख्ख राज्य हादरलं. त्यानंतर राज्यभरातून संतप्त पडसाद उमटले. या घटनेनंतर मुल, महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे संतापाचे वातावरण आहे. मात्र याचदरम्यान पुण्यातही असाच धक्कादायक प्रकार झाल्याचेही उघड झालंय. दोन घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या नराधमांनीच चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आलंय. विद्येचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यातून हा प्रकार उघडकीस आला असून अख्खं शहर हादरलं आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चिमुकल्या मुली वासनेच्या बळी ठरल्या आहेत.

त्यापैकी पहिल्या घटनेत एका 78 वर्षांच्या नराधम वृद्धाने अवघ्या 7 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. त्याने त्या मुलीच्या गळ्याला चाकू लावत, जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. मधुकर पिराजी थिटे असे 78 वर्षीय गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.या घटनेत सातवर्षीय पीडित मुलीच्या आजीने फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित वृद्धाला बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्या वृद्ध नराधमाने चिमुकल्या मुलीला खाऊचं आमिष दाखवलं आणि तिला घरी नेलं. तेथे नेऊन तिने तिच्यावर अत्याचार केला. त्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिचे तोंड दाबून गळ्याला चाकू लावला. तसेच, घरी किंवा पोलिसांना सांगितल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली.

अशीच एक दुसरी घटनाही शहरात घडली असून तेथेही एका ज्येष्ठ नागरिकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलाय.महावीर श्रीमलजी सिंगवी अस 70 वर्षीय गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने अल्पवयीन मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवत तिचा विनयभंग केला. या दोन्ही प्रकरणांमध्ये त्या नराधमांविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रचित गोयल असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी ३२ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. अत्याचाराची ही घटना एप्रिल 2018 ते डिसेंबर 2023 या कालावधीत वारंवार घडली.

प्राथमिक माहितीनुसार रचितने तो विवाहित असल्याची बाब लपवून विवाह नोंदणी संकेतस्थळावर नाव नोंदवले. या माध्यमातून त्याची एका तरुणीशी ओळख झाली. त्याने तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही तरुणी गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिला धमकावून गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने पुन्हा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. अखरे तरूणीने हिंमत गोळा करत कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.