Crime News : सिनेस्टाईल चोरी समोर आल्यानं चर्चा तर होणारच, चोरीची घटना समोर आल्यानं पोलीसही चक्रावले…
नाशिकच्या येवला तालुक्यातील पोलीस ठाण्यात सिनेस्टाईल पद्धतीने चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
नाशिक : सध्या नाशिकच्या येवला रोड येथे एक चोरी ( Nashik Robbery News ) संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. सिनेस्टाईल चोरी समोर आल्याने चर्चा होत असली तरी दुसरीकडे पोलिसांसमोर ( Nashik Police ) मोठं आव्हान निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे ट्रॅक चालक यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विश्रांती थांबलेल्या ट्रकचालकाला चोरट्यांनी मारहाण करत संपूर्ण आपल्या ट्रकमधून 8 लाखांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले आहे. ट्रकमध्ये लाखों रुपयांचे ट्यूब आणि टायर असल्याची माहिती ट्रकचालकाने फिर्यादीत केली आहे. ट्रकचालकाच्या फिर्यादीवरुन येवला पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकपासून येवला शहराकडे जाणाऱ्या रोडवर एक ट्रक चालक नासीर मोहम्मद शरीफ खान हा ट्रकमालक निजामुद्दीन शाह यांच्यासोबत एका हॉटेलवर विश्रांतीसाठी थांबले होते. त्याचवेळी ट्रकमध्ये बसून काही चोरटे आले.
ट्रकमध्ये आराम करत असलेल्या ट्रकचालक आणि ट्रकमालक यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांना पकडून ठेवत इतरांनी ट्रकमधील संपूर्ण माल सोबत आणलेल्या ट्रकमध्ये भरला आणि पळून गेले.
येवला तालुक्यातील अंगणगाव ते जळगाव येउर या दरम्यान ही घटना घडली आहे. यानंतर ट्रकचालक आणि ट्रक मालक हे जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली त्यानंतर येवला पोलीसांनी फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
मध्यरात्रीच्या दरम्यान ही घटना घडली असून ही लुटीची घटना चर्चेचा विषय ठरत असून वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. लूट करण्याऱ्या चोरट्यांनी आधीच लुटीचा प्लॅन केला असल्याचा संशय पोलिसांना आहे.
ट्रकमधील 68 टायर 67 ट्यूब, 68 नायलॉन फ्लप 2 मोबाईल असा एकूण ८ लाख ८१२ रुपये किमतीचा मुद्देमाल आपल्या ट्रकमध्ये काढून घेत घटनास्थळावरून पोबारा केला. त्यावेळी ट्रकमधून हा माल घेऊन चोरटे पसार झाले आहे.
येवला शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर चौघा अनोळखी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मालवाहतुक करणाऱ्या चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.