रात्रीचे जेवण जेवल्यानंतर 88 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, अमरावतीहून शिर्डीत सहलीला आले होते !
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील आदर्श हायस्कूलची शिर्डीला सहल आली होती. इयत्ता चौथी ते सहावीचे एकूण 230 विद्यार्थी सहलीला आले होते. सर्व विद्यार्थ्यांची शाळेने नेवासा येथे थांबण्याची व्यवस्था केली होती.
शिर्डी / मनोज गाडेकर (प्रतिनिधी) : अमरावतीहून शिर्डीत आलेल्या 88 विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. प्रीतम वडगावे यांनी सांगितले. अमरावतीतील 230 विद्यार्थी शिर्डीत सहलीसाठी आले होते. सर्व विद्यार्थी नेवासा येथे थांबले होते. नेवासा येथे रात्रीचे जेवण बनवण्यात आले होते. जेवण जेवल्यानंतर 88 विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे.
अमरावतील 227 विद्यार्थी शिर्डीला सहलीला आले होते
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील आदर्श हायस्कूलची शिर्डीला सहल आली होती. इयत्ता चौथी ते सहावीचे एकूण 227 विद्यार्थी सहलीला आले होते. सर्व विद्यार्थ्यांची शाळेने नेवासा येथे थांबण्याची व्यवस्था केली होती.
दरम्यान येताना शेवगाव तालुक्यात सर्व विद्यार्थ्यांना जेवण बनवून खाऊ घातले गेले. यावेळी अनेक मुलांनी जवळ असलेल्या विहिरीतील पाणी प्यायले तर अनेकांनी बोरं आणि चिंचाही खालल्या होत्या.
शिर्डीत पोहचताच मुलांची प्रकृती बिघडली
रात्री सहल शिर्डीत पोहचल्यानंतर काही जणांना उलट्या आणि मळमळ सुरू झाला. यानंतर रात्री 11 वाजता सर्व विद्यार्थ्यांना शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर
विद्यार्थ्यांवर तात्काळ उपचारा केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. 80 जणांवर प्राथमिक उपचार केले गेले तर 8 जणांना सलाईन देण्यात येताहेत.