Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला झालेल्या विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक! रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं

हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीवर सिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.

Pune : एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला झालेल्या विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक! रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं
सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 9:51 PM

पुणे : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर (10th Standard Student) चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली होती. या धक्कादायक घटनेत जखमी झालेल्या मुलीची प्रकृती आता चिंताजनक आहे. या विद्यार्थिनीला सुरुवातीला सिटी हॉस्पिटलमध्ये (Pune City Hospital) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता प्रकृती चिंताजनक असल्यानं या अल्पवयीन मुलीला रुबी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस (Yeravda Police) स्थाानकात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातही या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर चाकू हल्ला करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली होती. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

असा आहे घटनाक्रम!

पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी येथे ही खळबळबजनक घटना घडली. या चाकू हल्ल्यात मुलीच्या पोटाला, हाताला गंभीर जखम झाली. या प्रकरणाचा अधिक तपास शास्त्रीनगर पोलीस करत आहेत. दुसरीकडे पुणे शहरात एका तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत मुलीशी जवळीक साधत तिची फसवणूक केली.

मुलीसोबत प्रेमाचं नाटक करत तरुणानं या मुलीला लुबाडलं होतं. आपल्या नात्याबद्दल दोघांच्या घरी सांगेन, असं म्हणत तरुणानं या विद्यार्थिनीला ब्लॅकमेल(Blackmail) केले. यावरून मुलीला लुटल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 19 वर्षीय तरुणावर सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तसंच ऋत्विक अशोक दिघे (वय 19, रा. दत्तनगर, कात्रज) या संंशयिताला पोलिसांनी अटकही केली.

कुटुबीयांनी काय म्हटलं?

दरम्यान, या हल्ल्याचा पीडित विद्यार्थिनीच्या नातलगांनी निषेध केला आहे. तसंच जखमी झालेल्या मुलीच्या मदतीला शाळेतील सुरक्षा रक्षकांनी मदत करायला हवी होती, असंही म्हटलंय. या धक्कादायक घटनेनंतर आता आंदोलन छेडण्याचा इशारा पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

‘हात जोडून विनंती करते, वाचवा त्या मुलीला..वाचवा!’ चित्रा वाघ यांची हात जोडून नेमकी कुणासाठी विनंती?

‘त्या’ मुलीकडून माझी बदनामी सुरु ; रघुनाथ कुचिक यांची सायबर पोलिसात तक्रार

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.