पुणे हादरले! अवघ्या 13 महिन्याच्या लैंगिक अत्याचार
फक्त 13 महिन्याच्या लैंगिक अत्याचार झाल्याची घटना महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात घडली आहे.
पुणे : महिलांवरील अत्याचारांच्या घटनामंध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लहान मुली तसेच महिलांवरील बलात्कारांच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच आता तान्हुल्या मुली देखील असुरक्षित असल्याची भिती निर्माण करणारी घटना घडली आहे. फक्त 13 महिन्याच्या लैंगिक अत्याचार झाल्याची घटना महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात घडली आहे.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे पुणे हादरले आहे. फक्त 13 महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला आहे.
ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
वारजे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ओळखीतल्या व्यक्तीनेच हे दुष्कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी घरी जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या एका डिलीव्हरी बॉयने तरुणीला किस केला होता. तर, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे.