Badlapur Youth Drowned : बदलापूरच्या बॅरेज धरणात 17 वर्षीय मुलगा बुडाला, तीन दिवस उलटूनही युवक बेपत्ताच
उल्हासनगर येथील चार ते पाच मित्र तीन दिवसांपूर्वी पावसाळी सहलीसाठी बॅरेज धरण परिसरात उल्हास नदीवर आले होते. यावेळी मयत युवक बॅरेज धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरला होता.
बदलापूर : बदलापूरच्या बॅरेज धरणा (Barrage Dam)त एक 17 वर्षीय मुलगा बुडाल्या (Drowned)ची घटना तीन दिवसांपूर्वी घडली आहे. तीन दिवस उलटूनही अद्याप या युवकाचा शोध लागू शकला नसून, त्यामुळं त्याच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे. सदर तरुण उल्हासनगर येथील रहिवासी असून मित्रांसोबत बॅरेज धरणावर पिकनिक (Picnic)साठी आला होता. पाण्यात अंघोळीसाठी उतरला असता नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी तात्काळ याबाबत पोलीस आणि अग्नीशमन दलाला माहिती दिली. सध्या राज्यात पावसाचे थैमान सुरु असून यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
तीन दिवसापासून सुरु आहे बेपत्ता मुलाचा शोध
उल्हासनगर येथील चार ते पाच मित्र तीन दिवसांपूर्वी पावसाळी सहलीसाठी बॅरेज धरण परिसरात उल्हास नदीवर आले होते. यावेळी मयत युवक बॅरेज धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरला होता. यावेळी उल्हास नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. गेल्या तीन दिवसापासून त्याचा शोध सुरू असून अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही.
भोरमध्ये तलावात पोहण्यासाठी गेलेले तलाठी पाण्यात बुडाले
मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेलेले तलाठी पाण्यात बुडाल्याची घटना आज सकाळी भोर तालुक्यातील वरवे गावात घडली आहे. मुकुंद चिरके असे बुडालेल्या तलाठींचं नाव आहे. चिरके काही दिवसांपूर्वीच बदली होऊन भोर येथे आले होते. चिरके सकाळी सातच्या दरम्यान चार मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेले होते. चिरके पोहण्यात पटाईत होते. मात्र तलावात पोहत असताना त्यांना दम लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक रेस्क्यू टीमकडून त्यांचा शोध सुरु आहे. (A 17-year-old boy drowned in Badlapurs barrage dam)