वासना.. अत्याचार, अश्लील फोटो…घर दाखवण्याच्या बहाण्याने शेजारणीवरच… आणखी एका घटनेने मुंबई हादरली

Maharashtra Crime News : शेजाऱ्याने महिलेला घर दाखवण्याच्या बहाण्याने त्याच्या वासनेची शिकार बनवली. आरोपीने महिलेचे अश्लील फोटोही काढले होते, त्यामुळे तो तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता.

वासना.. अत्याचार, अश्लील फोटो...घर दाखवण्याच्या बहाण्याने शेजारणीवरच... आणखी एका घटनेने मुंबई हादरली
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 11:29 AM

मुंबई : हॉस्टेलमधील मुलीवर अत्याचार करून तिची हत्या आणि मीरा-रोड येथील लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या व्यक्तीने पार्टनरला क्रूरपणे संपवले, या दोन घटनांमुळे मुंबई हादरलेली असातानाच आणखी एक धक्कादायक घटना (crime news) समोर आली आहे. . शेजाऱ्याने महिलेला घर दाखवण्याच्या बहाण्याने नेले आणि तेथे तिला वासनेची शिकार बनवली. त्यानंतर पीडित महिलेचे अश्लील फोटो काढले व ते दाखवून ब्लॅकमेल करत आरोपीने महिलेवर अनेकदा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नालासोपारा भागातील ही दुर्दैवी घटना असून अश्लील फोटोंच्या सहाय्याने आरोपी पीडितेला वारंवार ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करत राहिला. मिळालेल्या वृत्तानुसार, हा आरोपी पीडितेच्या शेजारी राहतो. त्याने तिला त्याचे घर दाखवण्याच्या बहाण्याने आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचात्कार केला आणि तिचे अश्लील फोटो काढले. त्या फोटोंची धमकी देऊन अत्याचार सुरूच ठेवला. एवढंच नव्हे तर कोणासमोरही तोंड उघडल्यास पतीला मारून टाकेन अशी धमकीही त्याने दिली.

हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर आचोळे पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅक्सी चालकाने महिलांना केले ब्लॅकमेल

असाच धक्कादायक आणि हैराण करणारा प्रकार महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातूनही समोर आला आहे. जिथे एका कॅब ड्रायव्हरने महिलांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केले आणि त्यांची मॉर्फ केलेली छायाचित्रे प्रौढ वेबसाइटवर अपलोड करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली. कॅब ड्रायव्हरने सुमारे 24 महिलांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केले आहेत. व्हीपी रोड पोलिसांनी ब्लॅकमेलिंग करणाऱ्या आरोपी कॅब ड्रायव्हरला अटक केली आहे.

तो महिलांना एक लिंक पाठवायचा, ती क्लिक केल्यास त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक व्हायचे. त्यानंतर तो त्यांचे फोटो मॉर्फ करायचा आणि ते प्रौढ वेबसाईटवर टाकायची धमकी देत त्यांच्याकडे पैसे मागायचा.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.