CCTV Video : बदलापुरात घरासमोरच्या आवारातून दुचाकी चोरली, घटना सीसीटीव्हीत कैद

शनिवारी सकाळी मेहेर हे कामावर जाण्यासाठी निघाले असता त्यांना त्यांची दुचाकी जागेवर दिसली नाही. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये रात्रीच्या वेळी दोन चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचं त्यांना दिसलं.

CCTV Video : बदलापुरात घरासमोरच्या आवारातून दुचाकी चोरली, घटना सीसीटीव्हीत कैद
बदलापुरात घरासमोरच्या आवारातून दुचाकी चोरलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 4:58 PM

बदलापूर : मंदिरसमोर असलेल्या पार्किंगमधून दुचाकी (Two Wheeler) चोरून नेल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाली असून यानंतर दुचाकी चोरांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यात दुचाकी चोरी (Theft)च्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून त्यामुळे पोलिसांकडून बदलापूर शहरात रात्रीची गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

हँडल लॉक तोडून दुचाकी पळवली

बदलापूर पश्चिमेच्या एरंजाड गावातील हनुमान मंदिरासमोर राहणारे गणेश मेहेर यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घरासमोर त्यांची बजाज डिस्कव्हर ही दुचाकी पार्क केली. यानंतर 10.30 च्या सुमारास त्यांच्या घरासमोर एका दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून दोन चोरटे आले. त्यापैकी एकाने दुचाकीवरून उतरून मेहेर यांच्या बजाज डिस्कव्हर दुचाकीचं हॅन्डल लॉक तोडलं आणि वायर जोडून दुचाकी सुरू करत निघून गेला. शनिवारी सकाळी मेहेर हे कामावर जाण्यासाठी निघाले असता त्यांना त्यांची दुचाकी जागेवर दिसली नाही. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये रात्रीच्या वेळी दोन चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचं त्यांना दिसलं. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (A bike was stolen from the premises in front of the house in Badlapur, the incident was caught on CCTV)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.