PUNE : या कारणामुळे बिल्डरने रहिवाशाला केली मारहाण, आरडाओरड होताचं सोसायटीतील लोकं जमली
सोसायटीमधील रहिवाशी दिपक फडतरे यांच्याकडून महिन्याचा मेंन्टनन्स थकल्यामुळे बिल्डर तुषार शहाने तीन व्यक्तींना घेऊन रहिवाशाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
पुणे : पुण्यात (PUNE) सोसायटीचा मेंन्टनन्स (Maintenance) न भरल्यामुळे बिल्डरने लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा एक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामध्ये रहिवाशाचा हात फॅक्चर झाला असल्याची तक्रार मुंढवा पोलीस (Mudhava Police)ठाण्यात नोंद झाली आहे. दिपक फडतरे असं तक्रार दाखल केलेल्या रहिवाशाचं नाव असून पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत असल्याची माहिती सांगितली आहे.
सोसायटीमधील रहिवाशी दिपक फडतरे यांच्याकडून महिन्याचा मेंन्टनन्स थकल्यामुळे बिल्डर तुषार शहाने तीन व्यक्तींना घेऊन रहिवाशाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडला. दोघांच्यात मोठं भांडण झाल्यामुळे संपुर्ण सोसयटीतील लोकं जमली होती. त्यावेळी बांधकाम व्यवसायिक तुषार शहाने यांच्या माणसांनी बेदम मारहाण केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस या प्रकरणाची अधिक माहिती घेत असून पुढील तपास करीत आहेत.