Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडील आईला मारहाण करत होते, मुलगी मध्ये पडली, मग मायलेकीसोबत जे घडलं ते भयंकर

पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. एक दिवस पती-पत्नीचा वाद टोकाला गेला. आई-वडिलांची वाद मिटवण्यासाठी मुलगी मध्ये पडली. पण त्यानंतर जे घडलं त्याने सर्वच हादरले.

वडील आईला मारहाण करत होते, मुलगी मध्ये पडली, मग मायलेकीसोबत जे घडलं ते भयंकर
कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलीची हत्याImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 3:06 PM

सूरत : गुजरातमध्ये एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका व्यावसायिकाने पत्नीसह 15 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना सूरजमध्ये उघडकीस आली आहे. मुलीची हत्या करुन मृतदेह नाल्यात फेकून दिला. दुहेरी हत्या झाल्या तेव्हा मोठी मुलगीही घरातच होती. दीव, दमण आणि दादरा या केंद्रशासित प्रदेशातील सिल्वासा येथून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. योगेश मेहता असे अटक आरोपीचे नाव आहे. मेहताने स्वतः पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. मात्र, दोन्ही हत्यांची अचूक माहिती आरोपी देत ​​नाही.

आईला वाचवण्यासाठी मध्ये पडली अन्…

वडील आईला मारहाण करत होते.यावेळी 15 वर्षाची मुलगी आईला वाचवण्यासाठी मध्ये पडली. यामुळे संतपालेला आरोपी योगेश मेहता याने आपल्या मुलीचीही हत्या केली. मेहताने दोन्ही महिलांना मारण्यासाठी हातोड्याचा वापर केला आणि नंतर चाकूने आपल्या मुलीचे तुकडे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी हातोडा जप्त केला असून, चाकूचा शोध सुरू आहे.

रोजच्या वादातून पत्नीची हत्या

पती-पत्नीमध्ये नेहमी वाद आणि भांडण होत असे. यातूनच त्याने पत्नीची हत्या केल्याची माहिती आरोपीने दिली. जोडप्याचे 20 वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक 18 वर्षाची आणि एक 15 वर्षाची मुलगी होती. यापैकी 15 वर्षाची मुलगी आईला वाचवायला मध्ये पडली म्हणून आरोपीने तिचीही हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजच्या भांडणामुळे या जोडप्याने पोलिसांशी संपर्क साधला होता. घटस्फोटासाठी त्याने पोलिसांची मदत घेतली होती, मात्र समुपदेशनानंतर ते दोघे घरी परतले. पोलीस कालव्यात मुलीचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.