अंधेरीत व्यापाऱ्याला चाकूच्या धाकावर २२ लाखाला लुबाडले, पोलीसांनी केली त्रिकूटाला अटक
मुंबई उपनगरातील अंधेरी येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी एका व्यापाऱ्याला लुबाडल्याची घटना घडल्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला. त्यानंतर विविध पथकांनी तांत्रिक माहितीच्या आधारे विरार, अंधेरी आणि मालाड येथून तिघा जणांना अटक केली.
मुंबई : ऑटो रिक्षामधून चाललेल्या मुंबईच्या एका प्लास्टीक ( plastic ) व्यापाऱ्याला बाईकवरून हेल्मेट घातलेल्या दोघांनी ट्रॅफीकमध्ये रिक्षा थांबली असता चाकूचा ( knife ) धाक दाखवत लुबाडले होते, त्यानंतर पोलीसांनी लागलीच सूत्रे फिरवून मंगळवारी एका त्रिकूटाला मुद्देमालासह पकडले. एका प्लास्टीक व्यापाऱ्यास तो त्याचे कलेक्शन घेऊन रिक्षाने ( auto ) घेऊन चालला असता त्याला गेल्या बुधवारी बाईकवरून हेल्मेट घालून आलेल्या दुकलीने चाकू दाखवत लुबाडले. त्यांच्या हातातील पिशवी खेचून हे बाईकस्वार पळून गेले होते.
तक्रारदार व्यापारी २२ लाखाची रोकड घेऊन ऑटोमधून जात असताना अंधेरीत ट्रॅफीक जाममध्ये रिक्षा थांबली असताना बाईकवरून आलेल्या दोघांनी त्यांना चाकू दाखवत त्यांच्या हातातील रोकड असलेली पिशवी घेऊन ते पसार झाले, त्यानंतर व्यापाऱ्यांनी पोलीसांमध्ये तक्रार दाखल केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पोलीस देखील चक्रावले.
मुंबईत दिवसाढवळ्या चोरट्यांनी व्यापाऱ्याला लुबाडल्याने पोलीसांनी तपास सुरू केला. त्यानंतर विविध पथकांनी तांत्रिक माहितीच्या आधारे विरार, अंधेरी आणि मालाड येथून या प्रकरणी तिघा जणांना अटक करीत २२ लाखांपैकी २० लाखाची रोकड हस्तगत करण्यात यश मिळविले.
व्यापारी रोकड घेऊन जाणार आहे, हे आरोपींना पूर्ण माहीती असल्याने कोणी तरी ओळखीच्याने किंवा ज्याला व्यापाऱ्याकडे रोखड कधी असते हे माहीत आहेत, त्यानेच हा गुन्हा केला असावा असा पोलीसांचा संशय होता. त्यावरून सर्व माजी कर्मचाऱ्यांची माहीती काढण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात एका माजी कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक झाल्याचे जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. अटक आरोपीतील एक जण सराईत गुन्हेगार असून त्याच्या मदतीने या माजी कर्मचाऱ्याने मालकावर पाळत ठेवत हा गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.