नवी दिल्ली : नोएडातील एक चार्टर्ड अकाउंटंट (सीए) सायबर गुन्हेगारांच्या फाशात अडकला. आरोपींनी त्याला युट्युबवर व्हिडीओ लाईक करण्यास सांगितले. सुरुवातीला काही कमाई झाली. परंतु, नंतर तो त्या दलदलीत फसत गेला. ही घटना सेक्टर ३६ सायबर क्राईम ठाणा सेक्टर ४६ ची आहे. ठाणा प्रभारी रिता यादव यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सेक्टर ३६ सायबर क्राईम ठाण्यात राहुल कुमावत यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार आठवड्याभरापूर्वी एक मेसेज आला होता. पार्ट टाईम जॉब करून लाखो रुपये कमवा असं सांगण्यात आलं. मॅसेजमध्ये दिल्या गेलेल्या नंबरवर फोन करण्यात आला. एका व्यक्तीने फोन उचलून स्वतःला कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगितले.
त्या मॅनेजरने घरी बसून काम करण्याबद्दल समजावून सांगितले. त्यानंतर एका टेलिग्राम गृपला जोडले. त्यांना रोज एका ई कॉमर्स कंपनीचे पेज आणि युट्युब चॅनलचे व्हिडीओवर रिव्हू आणि शेअर करण्याचे काम दिले. त्यातून काही उत्पन्न मिळाले.
काही दिवसांनंतर मुख्य काम देऊन १८ लाख रुपये लुटले. जेव्हा त्यांनी ते पैसे मागितले तेव्हा त्यांना टेलिग्राम गृपमधून बाहेर काढण्यात आले. सायबर विशेषज्ञ म्हणतात, सायबर ठग इंटरनेट मीडियाच्या माध्यमातून शिकार शोधत राहतात. तुम्हाला कोण अशाप्रकारचा फोन करत असेल, तर कंपनीच्या बाबतीत व्यवस्थित तपासणी करावी.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खात्याबद्दल माहिती देऊ नये. सायबर ठग सुरुवातील पैसे परत करतात. त्यानंतर मोठी रक्कम घेऊन पसार होतात. नोएडातील सीएने अशाचप्रकारे १८ लाख रुपये गमावले. युट्युबवर लाईक आणि शेअरिंगचे काम दिले होते. सुरुवातीला सीएची कमाई झाली. त्यानंतर फसवणूक झाली. तोपर्यंत १८ लाख रुपये गेले होते.