नवी दिल्ली : दिल्लीत एक भयंकर संतापजनक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून एका कार चालकाने अनेकांना चिरडल्याची घटना 26 ऑक्टोबर रोजी दिल्लीतून अलीपूर परिसरात घडली आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी आरोपी कार चालकाला अटक केली आहे.
अलीपूर भागातील हा रस्ता खूपच अरुंद होता. त्यामुळे कार चालकाला गाडी बाहेर काढण्यास अडथळा निर्माण होत होता. यावरुन कारचालक आणि दुचाकीस्वाराची वादावादी सुरु झाली.
A car driver crushed several people with his car over a minor dispute in Alipore area of #Delhi. This entire incident #CCTV of 26 oct was recorded in the camera. The police have arrested the accused driver and three people have been injured in the incident. pic.twitter.com/NKnbKHH3RR
— Siraj Noorani (@sirajnoorani) October 28, 2022
परिसरातील नागरिकही दुचाकीस्वाराच्या मदतीला आले. यानंतर कारचालकाने त्यांच्याशीही वादावादी आणि हाणामारी करण्यास सुरवात केली. काही काळ त्यांच्यात वादावादी सुरु होती.
यानंतर रागाच्या भरात कारचालक कारमध्ये बसला आणि कार सुरु केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, त्याने कार थेट दुचाकीस्वारासह अन्य नागरिकांच्या अंगावर घातली. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
घटनेनंतर आरोपी कारचालक पळून जाऊन लागला. नागरिकांनी त्याला पकडण्याचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र पोलिसांनी कसून शोध घेत आरोपी कारचालकाला अटक केली आहे.
आरोपीविरोधात कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन मान असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा अधित तपास करत आहेत.
एका ढाब्याच्या पार्किंगवरुन झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना गाझियाबादमध्ये घडली. मयत तरुणाची कार अशी उभी होती की दुसऱ्या कारचा दरवाजाच उघडता येत नव्हता. यावरुन झालेल्या वादातून ही हत्या झाली.