Ahmednagar News : मंडप सजला होता, वऱ्हाडी आले, लग्नघटिका जवळ आली होती, वर-वधू एकमेकांच्या गळ्यात हार घालणार इतक्यात…

नगरमध्ये एका मंगल कार्यालयात विवाह सोहळा सुरु होता. सर्व वऱ्हाडी जमले होते. लग्नाच्या विधी पार पडत होत्या. लग्नाला अगदी काही क्षण राहिले असतानाच भरमंडपात जे घडलं त्याने सर्वच हैराण झाले.

Ahmednagar News : मंडप सजला होता, वऱ्हाडी आले, लग्नघटिका जवळ आली होती, वर-वधू एकमेकांच्या गळ्यात हार घालणार इतक्यात...
नगरमध्ये ऐन लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 9:06 AM

अहमदनगर / 23 ऑगस्ट 2023 : अहमदनगरमध्ये एका लग्नाची भलतीच गोष्ट समोर आली आहे. ऐन लग्नात जे घडलं त्यानंतर लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. एका मंगल कार्यालयात एक लग्नसमारंभ सुरु होता. लग्नघटिका जवळ आली होती. वधू-वर एकमेकांच्या गळ्यात हार घालण्याच्या तयारीत असतानाच अचानक नवरदेवाची पहिली पत्नी मंडपात हजर झाली. यानंतर नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात गेली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल पवार असे आरोपी नवरदेवाचे नाव आहे. विशाल हा पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दुसरा विवाह करत होता. भरमंडपात अचानक घडलेल्या या नाट्यामुळे वधूमंडळी आणि नातेवाईकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे.

काय आहे प्रकरण?

विशाल पवार याचे आधीच लग्न झाले असून त्याला एक मुलगाही आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच विशाल दुसरा विवाह करत होता. दुसऱ्या मुलीबरोबर उपनिबंधक कार्यालयात विवाह करून नंतर एका हॉटेलमध्ये लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते. पतीच्या दुसऱ्या विवाहाची माहिती छत्रपती संभाजी नगरमध्ये राहणाऱ्या पत्नीला कळली. पत्नीने तात्काळ आई-वडील आणि इतर नातेवाईकांसह नगर गाठले.

नगरमधील मंगल कार्यालयाचा पत्ता शोधला आणि लग्न लागायच्या आत पत्नी लग्नमंडपात हजर झाली. लग्नमंडपात पहिल्या चांगलाच राडा केला. महिलेने आधी नियोजित वधूला चोप दिला. अचानक घडलेल्या या घटनेने नववधूसह नातेवाईकही गोंधळून गेले. वऱ्हाड्यांपैकी कुणीतरी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ मंगलकार्यात हजर झाले आणि लग्नाची वरात थेट पोलीस ठाण्यात नेली.

हे सुद्धा वाचा

नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल

पहिल्या पत्नीच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात विशाल पवार याच्याविरोधात कलम 494 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विशाल हा जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे, तर त्याची नियोजीत वधू छत्रपती संभाजी नगरमधील रहिवासी आहे. मात्र पहिल्या पत्नीपासून दुसरे लग्न लपवण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी नगरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण अखेर त्यांचा डाव फसलाच.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.