नाशिक : अल्पवयीन प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार ( Nashik Crime News ) केल्याने ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर तिला मारहाण करीत असल्याची बाब समोर आली असून त्या प्रकरणी गंगापुर पोलिस ठाण्यात वीस वर्षीय संशयित आरोपीवर पॉक्सो आणि बलात्काराच्या ( Rape case ) कलमाखाली गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उउडाली आहे. गंगापूर रोड येथील गंगासागर कॉलनीत राहणाऱ्या आकाश एकनाथ काळे याच्यावर गुन्हा करण्यात आला आहे. स्वतः पीडित मुलीने तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संशयित आकाश काळे याने पीडित अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले आणि नंतर वारंवार बलात्कार केले. त्यानंतर मुलगी गर्भवती राहिल्याने तिला मारहाण सुरू केली होती.
1 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2023 च्या दरम्यान हे संपूर्ण प्रकरण असल्याचे पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. पीडित तरुणीला संशयित आकाश काळे हा घरी घेऊन जात होता आणि शरीरसंबंध केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.
काही काळानंतर पीडित तरुणीने त्याच्याशी बोलण्यास नकार देत बोलणं बंद केले होते, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण तुझ्या घरी सांगेन म्हणत मारहाण सुरू केली होती. त्यानंतर पीडित मुलीने थेट पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दिली आहे.
खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई नाका पोलिस ठाण्यात असेच प्रकरण दाखल झाले. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध केल्याची बाब समोर आली असून त्याचाही तपास सुरू आहे. मात्र हा संपूर्ण प्रकार पाहता अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकारणतील संशयित आरोपी आकाश काळे याचा शोध पोलिस घेत असून पुढील काळात तपासात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान माणुसकीला कालिमा फासणाऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे.