नाशकात होळीला गालबोट, मिरची व्यापाऱ्याच्या जिवावर कोण उठलं? नाशिक हदारलं
नाशिकमध्ये होळी साजरी होत असतांना पंचवटी येथे एका व्यापऱ्याची हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये नाशिक पोलिसांकडून तपास सुरू आहे.
नाशिक : नाशिक शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी व्हायचे नाव घेत नाहीये. त्यात खुनाच्या ( Nashik Crime News ) घटना तर सातत्याने घडत आहे. त्यामुळे नाशिक शहरात नेमकं चाललंय तरी काय ? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. नाशिक शहरातील म्हसरूळ येथील मिरची व्यापऱ्याचा खून ( Murder ) झाल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे होळी सण साजरा करत असतांना अचानक किरण गुंजाळ यांचा खून झाल्याची बाब समोर आली आहे. म्हसरूळ पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात असला तरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण गुंजाळ यांच्या हत्येमागील कारण अद्यापही समोर आलेले नसले तरी ऐन सणासुदीच्या दिवशी हत्येची बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पंचवटी परिसरातील दिंडोरी नाका येथे ही घटना घडली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे.
नाशिक शहरात फसवणूक, खून, चोऱ्या असे गुन्हे नित्याचेच झाले आहे. नाशिक शहर हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून हत्याच्या घटना देखील वाढल्या आहे. त्यामध्ये क्षुल्लक कारणावरुन हत्या होत असल्याचे समोर आले आहे. त्यातच होळीच्या दिवशी झालेल्या हत्येने नाशिक हादरले आहे.
किरण गुंजाळ या तरुणाचा खून झाल्यानंतर पंचवटी परिसरात खळबळ उडाली आहे. खरंतर मयत व्यक्ती हा म्हसरूळ येथील शनी मंदिर परिसरात राहत होता. त्याची मिरची व्यापारी म्हणून ओळख होती. त्यात आता किरण गुंजाळ याच्या हत्येमागील कारण समोर आलेले नाही.
किरण गुंजाळ याच्या जिवावर कोण उठलं होतं? व्यावसायिक विरोधक असलेल्या व्यक्तीने तर त्याचा खून केला? किंवा मित्रांनीतर किरणची हत्या केली नाही ना ? असे विविध सवाल उपस्थित होत असून पोलिस तपासकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.