आई- वडिल सारखं आरोडायचे त्यात अभ्यासचा कंटाळा… म्हणून जेलमध्ये जाण्याचा प्लान बनवला; पोराचा कारनामा पाहून पोलिसही हादरले

आरोपी मुलगा दोनदा नापास झाला आहे. पालक त्याच्यावर अभ्यासासाठी दबाव आणत होते. त्याला शाळेत जाण्याचा कंटाळा येत होता. शाळेत जावे लागू नये म्हणून त्याने आपल्या मित्राची हत्या केली. यामुळे तो थेट जेलमध्ये जाईल आणि शाळेत जाण्याचा प्रश्नच राहणार नाही असा प्लान आरोपी मुलाने बनवल्याचे पोलिसांनी सांगीतले.

आई- वडिल सारखं आरोडायचे त्यात अभ्यासचा कंटाळा... म्हणून जेलमध्ये जाण्याचा प्लान बनवला; पोराचा कारनामा पाहून पोलिसही हादरले
धक्कादायक प्रकार...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 4:42 PM

गाझियाबाद : आई वडील मुलांना नेहमीच अभ्यासासाठी ओरडत असतात. अभ्यासाचा वैताग आणि आई वडिलांचा ओरडा या सगळ्यांपासून वाचण्यासाठी एका शालेय विद्यार्थ्यांनी जेलमध्ये जाण्याचा प्लान बनवला यासाठी त्याने त्याच्या मित्राची हत्या केली आहे. मध्य प्रदशातील(Madhya Pradesh) गाझियाबादमध्ये (Ghaziabad)ही घटना घडलेय. ज्या पद्धतीने या मुलाने आपल्या मित्राची हत्या केले हे पाहून पोलीसही हादरले आहेत. आरोपी मुलाने सर्व प्रथम मित्राचा गळा दाबला नंतर त्याच्या डोक्यात बिअरची बॉटल फोडली.

गाझियाबादमधील मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे थराराक हत्याकांड घडले आहे. सोमवारी सायंकाळी एका विद्यार्थ्याने त्याच्या मित्राची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा दहावीचा विद्यार्थी आहे. आरोपीचे वय 16 वर्ष असून त्याने आपल्या 13 वर्षाच्या मित्राची हत्या केली आहे. आरोपी विद्यार्थाने हत्या करण्यामागे पोलिसांना सांगीतलेले कारण देखील अतिशय धक्कादायक आहे.

शाळेत जाण्याचा कंटाळा म्हणून जेलमध्ये जाण्याचा प्लान बनवला

आरोपी मुलगा दोनदा नापास झाला आहे. पालक त्याच्यावर अभ्यासासाठी दबाव आणत होते. त्याला शाळेत जाण्याचा कंटाळा येत होता. शाळेत जावे लागू नये म्हणून त्याने आपल्या मित्राची हत्या केली. यामुळे तो थेट जेलमध्ये जाईल आणि शाळेत जाण्याचा प्रश्नच राहणार नाही असा प्लान आरोपी मुलाने बनवल्याचे पोलिसांनी सांगीतले.

अभ्यास टाळण्यासाठी आरोपी विद्यार्थ्याने तुरुंगात जाण्याची योजना आखली. यासाठी त्याने मित्राची हत्या केली. त्याने आधी तिचा गळा दाबला, नंतर बिअरची बाटली फोडली आणि त्याच्या काचेने मित्राचा गळा चिरला. आरोपीला मंगळवारी बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले.सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता मृत 13 वर्षीय मुलाचा मृतदेह दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेखाली सापडला. मृतदेहाची ओळख पटवल्यावर पोलिस आरोपीपर्यंत पोहचले.

हत्येचे ठिकाण ठरवले आणि सलग तीन मित्राला तेथे घेऊन गेला

कुणाची हत्या करायची यावर विचार केल्यानंतर त्याने त्याच्या एका मित्राची निवड केली. यासाठी त्याने दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेखाली एक निर्जन जागा निवडली. एक्स्प्रेस वेची उंची जास्त असल्याने खालची बाजू कोणाला दिसत नाही अशी ही जागा आहे. गावातील सहसा कुणीही तिथे जात नाही. आरोपी हा मित्राला घेऊन सलग तीन दिवस तेथे जात होता. अखेरीस डाव साधत त्याने आरोपीने मित्राची हत्या केली.

कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही, आरोपी विद्यार्थ्यांने पोलिसांना दिली धक्कादायक कबुली

आरोपी विद्यार्थी अभ्यासात कमजोर होता. दहावीत तो दोन वेळा नापास झाला. तिसऱ्यांदा तो दहावीत शिकत होता. आई-वडिलांनी त्याच्यावर अभ्यासासाठी खूप दबाव आणत होते. मात्र, त्याला अभ्यासात अजिबात रस नव्हता. अभ्यासाठी पालकांचे कोणतेही दडपण येऊ नये म्हणून त्याला त्याच्या पालकांपासून दूर राहायचे होते. जेलमध्ये अभ्यासाचे कोणतेच दडपण नसते. यासाठीच त्याने मित्राची हत्या करुन तुरुंगात जाण्याचा प्लान बनवला. महिनाभर तो याचे प्लानिंग करत होता. यासाठी त्याने मोबाईलवर अनेक व्हिडओ देखील पाहिले. होते असे त्याने पोलिसांना सांगीतले. आरोपीला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप झालेला नाही. रोज रोज आई वडिलांचा ओरडा ऐकण्यापेक्षा जेलमध्ये जाण योग्य वाटल्याचे हा मुलगा म्हणाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.