रंगपंचमी खेळल्यानंतर मित्रांसोबत तलावावर अंघोळीला गेला, मात्र परतलाच नाही !

रंगपंचमी खेळल्यानंतर मित्रासोबत तलावात अंघोळीसाठी गेला. मात्र ही अंघोळ त्याची शेवटची ठरली. पाण्याचा अंदाज न आल्याने दहावीचा विद्यार्थी तलावात बुडाला.

रंगपंचमी खेळल्यानंतर मित्रांसोबत तलावावर अंघोळीला गेला, मात्र परतलाच नाही !
तलावात पोहायला गेलेला विद्यार्थी पाण्यात बुडालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 10:10 AM

भंडारा / तेजस मोहतुरे : रंगपंचमी खेळल्यानंतर गावातील चार मित्र तलावात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी सर्वजण अंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याच्या अंदाज न आल्याने दहावीचा विद्यार्थी पाण्यात बुडाला. मित्रांसोबतची ही रंगपंचमी त्याची अखेरची ठरली. चैतन्य राजेश मुटकुरे असे बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे ऐन सणाच्या दिवशी गावावर शोककळा पसरली आहे. चैतनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे.

रंगपंचमी खेळल्यानंतर सर्व मित्र अंघोळीला गेले

मयत चैतन्य हा उज्वल विद्यालय येथे दहावीत शिक्षण घेत होता. रंगपंचमी खेळून गावातील तलावावर चार ते पाच मित्रांसोबत अंघोळीसाठी गेला होता. चैतन्य याने तलावाच्या काठावर कपडे काढून तलावात आंघोळीसाठी उतरला. सोबत चार मित्रही पाण्यात उतरले. चैतन्य हा खोलपाण्यात गेला. पोहायला येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने चैतन्य हा पाण्यात बुडू लागला.

मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ ठरला

सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र चैतन्यला वाचविण्यात यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी तलावाजवळ एकच गर्दी केली. घटनेची पोलिसांना देण्यात आली. तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकालाही पाचारण करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

सणाच्या दिवशीच गावावर शोककळा

आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी दाखल होत मृतहाचा शोध सुरू केला. सर्च मोहिम राबवत काही तासातच मृतदेह बाहेर काढण्यात आला. चैतन्य हा सर्वाचा लाडका असल्याने कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. मृतदेह शवविच्छेदनाकरीता लाखनी येथे पाठविण्यात आला. रंगपंचमीच्या दिवशीच घटना घडल्याने गावात शोकाकूल वातावरण आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.