नवी मुंबई : वाशी येथील महापालिका रुग्णालया (Municipal Hospital)त धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या जेवणा (Lunch)त मेलेले झुरळ (Cockroach) आढळले आहे. दुपारच्या वेळी जेवणासाठी आलेल्या ताटामध्ये मेलेले झुरळ आढळले. यावरुन नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट होते. यामुळे मनपा रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. असे प्रकार घडल्यास रुग्णालयात बरे होण्याऐवजी आणखी दुसरे आजार त्यांना उद्भवण्याची शक्यता आहे. आता महापालिका प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वाशीतील मनपा रुग्णालयात दुपारी आलेल्या जेवणामध्ये चक्क मेलेले झुरळ आढळल आहे. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला हे जेवण देण्यात आलं होतं. या जेवणात चक्क मेलेलं झुरळ आढळलं. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आपणास पाहायला मिळते. तसेच सध्या मनपा रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गोरगरीब जनता या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येते. मात्र त्यांच्या जेवणाबाबत असे प्रकार घडत असतील, तर रुग्णांनी उपचारासाठी जायचं कुठे असा देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रुग्णांचे या जेवणाकडे लक्ष गेले, त्यामुळे संबंधित प्रकार उघडकीस आला. (A cockroach was found in the patients food at the Navi Mumbai Municipal Hospital)