विमानतळावर चार हॉर्नबिल पक्ष्यांच्या तस्करीचा डाव उधळला, AIU ने केली कारवाई
विमानतळावर चार दुर्मिळ जातीच्या हॉर्नबिल पक्ष्यांना सामानात लपवून त्यांची तस्करी करणाऱ्या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. यात एका महिलेचा देखील समावेश आहे.
मुंबई विमानतळावर अनेकदा सोने किंवा अंमलीपदार्थांची तस्करी करताना अनेक जणांवर कारवाई होत असते. परंतू मुंबई विमानतळावर दोघा प्रवाशांना चार हॉर्नबिल पक्ष्यांची तस्करी करताना पकडण्यात आले आहे. हे पक्षी परदेशी असून त्यांच्या तस्करी करण्याचा डाव सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने उधळला आहे. सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने या प्रकरणात दोन प्रवाशांना अटक केली आहे. यात एक महिला देखील सामील आहे. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहिती नुसार सोमवारी दुपारी एक थायलंड हून मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या या एअर इंडियाच्या विमानातील दोघा प्रवाशांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील सामानाची झडती घेतली तेव्हा अधिकाऱ्यांना धक्का बसला.
चॉकलेट्सच्या बॉक्समध्ये पक्षी लपवले
कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट ( AIU ) ने दोन प्रवाशांच्या सामानाची झडती घेतली. त्यात बॅंकॉक वरुन आलेल्या दोघा प्रवाशाच्या सामानात एका चॉकेलेट्स ठेवण्याच्या बॉक्स मध्ये हे पक्षी लपवलेले आढळले. वन अधिकाऱ्यांनी सांगितले की हे चारही हॉर्नबिल पक्षी परदेशी असून विसायन आणि सुलावेशी प्रजातीचे आहेत. ही प्रजाती लुप्त झालेल्या प्रजाती पैकी आहे. यांना चॉकलेटने भरलेल्या बॅगच्या आत ठेवून प्लास्टीकच्या कंटेनरमध्ये भरले होते. वनअधिकाऱ्यांनी सांगितले की पक्षी जीवंत आढळले आहे. त्यांची सुटका करण्यात आल्यानंतर स्थिर करण्यात आले. त्यांना पाणी पाजण्यात आले. रेसक्विंक एसोसिएशनशी ( RAWW ) संबंधित वन्यजीव तज्ज्ञांच्या उपस्थितीत त्यांना खाद्य देण्यात आले.
परदेशात रवाना केले
हे भारतातील मूळ असलेले पक्षी नसल्याने त्यांची औपचारिक पूर्ण झाल्यानंतर त्यांची रवानगी बॅंकॉक येथे करण्यात आली. वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोने ( WCCB ) वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या तरतूदीनुसार पक्षांना त्यांच्या मूळ देशात पाठविण्याचे आदेश जारी केले. त्यानंतर त्यांना बॅंकॉकला पाठविण्यात आले.या कायद्यानुसार अवैध तस्करीत जप्त करण्यात आलेल्या परदेशी जानवरांना मुळ देशात पाठविण्याचा कायदा आहे.