दररोज एका झोपडीत जाऊन पूजा करायचे, मग अंधश्रद्धेतून जे घडले ते त्याची कुणीही कल्पना करु शकत नाही !

एक जोडपे नियमित एका झोपडीत जाऊन पूजा करायचे. जवळपास वर्षभर त्यांचा हा कार्यक्रम सुरु होता. यानंतर अचानक जोडप्याने अंधविश्वासातून जे पाऊल उचलले ते पाहून कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्का बसला.

दररोज एका झोपडीत जाऊन पूजा करायचे, मग अंधश्रद्धेतून जे घडले ते त्याची कुणीही कल्पना करु शकत नाही !
गुजरातमध्ये अंधश्रद्धेतून जोडप्याने जीवन संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 8:46 PM

राजकोट : गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. अंधश्रद्धेतून एका जोडप्याने जे कृत्य केले ते भयंकर होते. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. राजकोटच्या विंछिया गावात अंधविश्वासातून एका जोडप्याने आपले जीवन संपवले. हेमूभाई मकवाना आणि हंसाबेन मकवाना अशी मयत जोडप्याची नावे आहेत. मरण्यापूर्वी दोघांनी एक सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्यांनी नातेवाईकांना माता-पिता आणि मुलांची काळजी घेण्यास सांगितले आहे. प्रथमदर्शनी सर्व प्रकरण अंधश्रद्धेतून घडल्याचेच दिसत आहे. तरीही पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

काय घडले नेमके ?

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमूभाई आणि हंसाबेन दोघेही एक वर्षापासून रोज एका झोपडीत पूजा करायला जात असत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, बळी देण्यासाठी त्यांनी स्वतः प्रथम गिलोटिनसारखे उपकरण बनवले. त्यानंतर त्याचा वापर करून त्याने आपले शीर कापून आत्महत्या केली. पती-पत्नीने या गिलोटिन सारख्या उपकरणासमोर अग्नीकुंड बांधले होते. प्रथम त्याने त्यात आग लावली. मग दोघेही गिलोटिनमध्ये ब्लेडखाली डोके टेकवून बसले. दोघींची मुंडकी ब्लेडने छाटली गेली आणि थेट अग्नीकुंडात पडली. यामुळे दोघांचे शीर जळाले. तर धड गिलोटिन उपकरणाजवळ पडले होते.

आत्महत्या, हत्या की आणखी काही याबाबत पोलीस तपास सुरु

घरच्या सदस्यांनी दोघांचे मृतदेह पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती दिली. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. घरी आई-वडिल आणि दोन मुलांसह दोघे राहत होते. त्यांचे नातेवाईकही घराच्या आसपासच राहतात. सुसाईड नोटमध्ये दाम्पत्याने आपल्या नातेवाईकांना आपल्या आई-वडिलांची आणि मुलांची काळजी घेण्यास सांगितले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जोडप्याने कोणाच्या सांगण्यावरून हे भयंकर पाऊल उचलले याचाही पोलीस तपास करत आहेत. ही हत्या तर नाही ना? याबाबतही पोलीस तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.