अनधिकृत इमारतींवरील कारवाई टाळण्यासाठी विकासकांची अनोखी शक्कल, पण अखेर पालिका अधिकारी पोहचलेच!

कल्याण-डोंबिवलीत अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरु आहे. अशाच एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक दाखल झाले. पण कारवाई सुरु करण्यासाठी पालिकेला तब्बल पाच तास लागले.

अनधिकृत इमारतींवरील कारवाई टाळण्यासाठी विकासकांची अनोखी शक्कल, पण अखेर पालिका अधिकारी पोहचलेच!
अनधिकृत बांधकामावरील कारवाई रोखण्यासाठी विकासकाची अनोखी शक्कलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 3:43 PM

सुनील जाधव, कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झाला आहे. भूमाफिया अधिकारी, लोकप्रतिनिधींना न घाबरता इमारती उभ्या करत आहेत. आज डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखान पाडा परिसरातील संजय पाटील या विकासकाच्या अनधिकृत इमारतींवर कारवाईसाठी महापालिका पथक गेले होते. मात्र ही कारवाई रोखण्यासाठी विकासकाने अनोखी शक्कल लढवली. यामुळे पाच तास महापालिकेचे अधिकारी खोळंबले होते. पण अखेर पोलिसांनी यातून मार्ग काढला आणि कारवाईला सुरवात झाली. मात्र भूमाफियांवर कोणाचाही अंकुश नसल्याने या अनधिकृत बांधकामांना रोखणार कसे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

काय आहे प्रकरण?

डोंबिवली कुंभारखान पाडा परिसरात आरक्षित भूखंडावर सुरु असलेल्या सात मजली इमारतीबाबत स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. वर्षभरापूर्वी करण्यात आलेल्या या तक्रारीची दखल घेत तत्कालीन प्रभाग क्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे आणि सुहास गुप्ते यांनी या इमारतीवर दोन वेळा तोडक कारवाई केली. मात्र तरीही अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून पाटील याने ही इमारत पुन्हा उभी केली होती. यामुळे आज या इमारतीवर कारवाई करण्याचा कार्यक्रम प्रशासनाकडून आखण्यात आला होता.

यासाठी सकाळीच पोलीस बंदोबस्तात जेसीबी, ब्रेकरच्या लवाजम्यासह पालिकेचे पथक कारवाईसाठी दाखल झाले. मात्र कारवाई रोखण्यासाठी विकासकाने शक्कल लढवत इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यात मधोमध दोन चारचाकी गाड्या उभ्या केल्या होत्या. या गाडीच्या मागच्या बाजूस गाडी बंद पडली आहे. दुपारपर्यंत काढण्यात येईल, सोसायटीच्या रहिवाशांना त्रास दिल्याबद्दल क्षमा असावी कृपया सहकार्य करावे असा स्टीकर चिकटवण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

या गाड्यांमुळे मोठी वाहने इमारतीपर्यत पोचण्याचा मार्ग बंद झाल्याने दुपारी 3 वाजेपर्यंत अधिकारी या गाड्या काढण्याची प्रतीक्षा करत होते. कारवाईला गेलेल्या पथकाच्या मार्गात दोन चारचाकी गाड्या उभ्या करत पथकाचा मार्ग जवळपास 5 तास रोखून धरण्यात आला होता.

अखेर टोईंगच्या मदतीने वाहने उचलत कारवाईला सुरवात

अखेर टोईंग व्हनच्या मदतीने गाड्या बाजूला करत मशिनरी जागेवर नेत कारवाई सुरु करण्यात आली. याप्रकरणी प्रभाग क्षेत्र अधिकारी गुप्ते यांनी संबधित इमारत मालकाविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तसेच अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुपारनंतर चार ब्रेकरच्या मदतीने इमारतीचे स्लॅब तोडण्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून थातूर-मातूर कारवाई केली जाते. यामुळेच अधिकाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा भूमाफिया नव्या जोमाने तोडलेल्या इमारतींना ठिगळ्या लावत नागरिकांच्या जीवाशी खेळ करतात. यामुळे या इमारती पूर्णपणे जमीनदोस्त करत त्याठिकाणी नव्याने इमारती उभ्या राहू नये यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.