Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai News : उपचाराचे बिल न दिल्याने डॉक्टरची पेशंटला मारहाण, रिक्षा चालक म्हणाला…

मुंबईतल्या कांदिवली भागात एका डॉक्टरने उपचाराचे बिल न दिल्याने मारहाण केल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे हे प्रकरण पोलिस स्टेशनला आल्यानंतर...

Mumbai News : उपचाराचे बिल न दिल्याने डॉक्टरची पेशंटला मारहाण, रिक्षा चालक म्हणाला...
Kandivli policeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 1:27 PM

गोविंद ठाकूर : कांदिवली पोलिसांनी (Kandivli police) कांदिवली गावात असलेल्या नोबल हॉस्पिटलच्या (nobel hospital) डॉक्टराविरुद्ध तक्रा दाखल केली आहे. उपचाराचे बिल न दिल्याने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ज्या पेशंटला मारहाण केली आहे, तो रिक्षा चालवतो. पैसे नसल्यामुळे डॉक्टरांनी मारहाण केल्याचं प्रकरण सीसीटिव्हीत (cctv video) कैद झालं आहे. कांदिवलीतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये (mns) जाऊन डॉक्टरवरती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज (maharashtra viral news) ताब्यात घेतला असून पुढील तपास करीत असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर रुग्णालयातील इतर गोष्टींची सुध्दा चौकशी करण्यात येणार आहे.

रिक्षा चालकावरती ज्यावेळी अन्याय होत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांना समजली. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशन गाठलं आहे आणि झालेला प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. पोलिसांनी तक्रार घेतल्यानंतर चौकशी सुरु केली आहे.

डहाणूकरवाडी व्हिलेज, कांदिवली येथील “नोबल रुग्णालयाच्या” डॉक्टर विजय गुप्ता यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरीब मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीचं नाव जमाल शेख असं आहे. ते रिक्षा चालवण्याचं काम करतात. रिक्षा चालकांनी हॉस्पिटलचे बिल न दिल्यामुळे त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

हे सुद्धा वाचा

सदर प्रकरण हॉस्पिटलच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये आले आहे. सदर विषयाची माहिती मनसे चारकोप विधानसभेतील महाराष्ट्र सैनिकांना मिळताच, महाराष्ट्र सैनिकांनी कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, सदर हॉस्पिटलचे डॉक्टर विजय गुप्ता यांच्यावर कलम 341 व 323 अंतर्गत गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई कारवाई करण्यास सांगितलं.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.