पिकनिकहून घरी परतत असताना अचानक गाडीचा टायर फुटला, स्त्री रोग तज्ज्ञाचा जागीच मृत्यू

सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने डॉ. पियुष बरलोटा यांचे कुटुंब आणि त्यांच्या मित्राचे कुटुंब मिळून दोन वाहनातून हैदराबादला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते.

पिकनिकहून घरी परतत असताना अचानक गाडीचा टायर फुटला, स्त्री रोग तज्ज्ञाचा जागीच मृत्यू
स्त्री रोग तज्ज्ञाचा अपघाती मृत्यू Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 9:32 PM

यवतमाळ : पिकनिक एन्जॉय करुन हैदराबादहून यवतमाळला घरी परतत असताना गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात स्त्री रोग तज्ज्ञाचा मृत्यू झाला आहे. तर डॉक्टर पतीसह तीन जण जखमी झाले आहेत. डॉ. सुरेखा बरलोटा असे मयत महिला डॉक्टरचे नाव आहे. निर्मल ते हैदराबाद मार्गावरील टोल नाक्यापासून 12 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. जखमींना निर्मल येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हैदराबादला पिकनिकसाठी गेले होते

सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने डॉ. पियुष बरलोटा यांचे कुटुंब आणि त्यांच्या मित्राचे कुटुंब मिळून दोन वाहनातून हैदराबादला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. पिकनिक करुन यवतमाळकडे परतत असतानाच आज निर्मल हैदराबाद मार्गावर डॉ. बरलोटा यांच्या गाडीचे टायर फुटले आणि भीषण अपघात घडला.

अपघातात डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू

या अपघातात डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तात्काळ धाव घेत अन्य जखमींना गाडीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. तर डॉ. पियुष बरलोटा यांची मुलगी आणि अन्य दोन जणींना गंभीर दुखापत झाली आहे. अन्य लोकांना किरकोळ दुखापत झाली.

हे सुद्धा वाचा

निर्मल येथील शासकीय रुग्णालयात मृतक डॉ. सुरेखा पियुश बरलोटा यांच्या पार्थीवाचे शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा सुरेखा यांचे पार्थिव यवतमाळात पोहोचण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरमध्ये दोन ट्रकची समोरासमोर धडक

पुणे-बंगलोर महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची घटना आज घडली आहे. या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. कोल्हापूर जवळील उचगाव परिसरात हा अपघात झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.