Nagpur Doctor : नागपुरात मेडिकलमधील डॉक्टर सेक्सटार्शनच्या जाळ्यात, तरुणीशी अश्लील चाळे पडले महागात

फेसबूकवरून त्यांनी एकमेकांचे नंबर शेअर केले. दोघांनीही अश्लील चॅटिंग केली. त्यानंतर व्हिडीओ कॉलवर बोलणं सुरू झालं. तीनं स्वतःचे कपडे अंगावरून उतरविले.

Nagpur Doctor : नागपुरात मेडिकलमधील डॉक्टर सेक्सटार्शनच्या जाळ्यात, तरुणीशी अश्लील चाळे पडले महागात
दिल्लीत दोन पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यातच भिडले
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 8:02 AM

नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (Government Medical College) एक डॉक्टर सेक्सटोर्शन जाळ्यात अडकला. सोशल मीडियावर (Social Media) तरुणीशी अश्लील चॅटिंग करणे त्याला महागात पडले. बदनामीच्या भीतीपोटी पावणेदोन लाखाची खंडणी द्यावी लागली. अश्लील व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याची ही तरुणी धमकी देत होती. वारंवार पैशाची मागणी केली जात होती. याप्रकरणी आता डॉक्टरने अजनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. डॉ. अक्षय जे. यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात (At Ajani Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित डॉक्टर मेडिकलमध्ये होता. तेव्हा त्यांना एका पायल नावाच्या तरुणीची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. या तरुणीने डॉक्टरला भूरळ घातली. ती सेक्स चॅटिंग करण्यास तयार होती.

आधी चॅटिंग, नंतर सेटिंग

फेसबूकवरून त्यांनी एकमेकांचे नंबर शेअर केले. दोघांनीही अश्लील चॅटिंग केली. त्यानंतर व्हिडीओ कॉलवर बोलणं सुरू झालं. तीनं स्वतःचे कपडे अंगावरून उतरविले. डॉक्टरनं कपडे काढण्यास नकार दिला. त्याच्या चेहऱ्यावर कॅमेरा असतानाचा स्क्रीन शॉट तीनं काढून ठेवला. पायलनं डॉक्टरला दुसऱ्याच दिवशी फोन करून दहा हजार रुपयांची मागणी केली. त्या मोबदल्यात व्हिडीओ चॅटिंगचे आश्वासन तीनं दिले. डॉक्टरने तिच्या खात्यात दहा हजार रुपये ऑनलाईन ट्रॉन्सफ्र केले.

पुन्हा पैशांची केली मागणी

दुसऱ्या दिवशी अश्लील व्हिडीओ कॉलिंग तीनं रेकॉर्ड केला. डॉक्टरच्या मोबाईलवर तो शेअर केला. परंतु, तो व्हिडीओ डिलीट करण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी तीनं केली. अन्यथा मेडिकलमधील त्याचे मित्र, नातेवाईक यांच्याकडं तो व्हिडीओ शेअर करण्याची धमकी दिली. शिवाय पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला. त्यामुळं डॉक्टर पुरता हादरून गेला. त्यानंतर ती पुन्हा पैशाची मागणी करून लागली. डॉक्टरनं तीला एकूण पावणेदोन लाख रुपये वेळोवेळी दिली. त्यानंतर त्रासून जाऊन तिचा मोबाईल प्लॉक केला. पण, ती काही त्याचा पिच्छा सोडत नव्हती. दुसऱ्या नंबरवरून फोन करत होती. शेवटी डॉक्टरनं पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला. अजनी पोलिसांनी फसवणूक व आयटी अॅक्टअंतर्गत तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा

काय आहे सेक्सटार्शन

सेक्सटार्शन करणाऱ्या काही टोळ्या कार्यरत आहेत. तरुणींच्या मदतीनं श्रीमंताना गाठलं जात. त्यांना अश्लील कृत्य करण्यास प्रवृत्त केलं जातं. त्यानंतर त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातात. बदनामीच्या भीतीने श्रीमंत लोकं पैसे देतात. त्यामुळं अशा सेक्सटार्शन करणाऱ्या टोळ्यांची हिंमत वाढते. याला काही मध्यमवर्गीय लोकंही बळी पडतात. गुन्हा झाल्यावर मोबाईल क्रमांक बदलला जातो. पुन्हा दुसरे टार्गेट ठेवले जातात. सावज शोधले जातात.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.